Join us

कृषी विकासासंदर्भात धोरणात्मक अडचणी असल्यास शासनाशी चर्चा करू- राज्यपाल रमेश बैस

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 21, 2023 9:36 PM

कृषीच्या योजनांचा राज्यपालांनी घेतला आढावा, अर्थसंकल्पीय निधीचे नियोजन करण्याच्या सूचना

कृषी विभागातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचा राज्यपाल रमेश बैस यांनी आज आढावा घेतला. यावेळी कृषी विकासासंदर्भात धोरणात्मक अडचणी असल्यास शासनाशी चर्चा करू असे राज्यपाल म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ व्हावा या दृष्टीने अर्थसंकल्पीय निधीचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी राज्यपालांनी दिल्या.

कृषी योजनांचा लाभ राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचत असल्याचे सांगताना फलोत्पादन विकासासंदर्भात स्वतंत्रपणे आढावा घेऊ असे राज्यपालांनी सांगितले. कृषी हा राज्याचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे हा कणा बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम केले पाहिजे असे सांगत

राजभवनात आज एका उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी कृषी योजनांचा आढावा घेतला. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण नानाजी देशमुख, स्मार्ट प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, 'महाबीज'चे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री आदी उपस्थित होते. यावेळी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार यांनी २०२३ – २४ या वर्षाकरिता कृषी क्षेत्रातील शासनाच्या उद्दिष्टांची तसेच २०२३ – २४ वर्षाकरिता अर्थसंकल्पीय तरतुदी व नव्या उपक्रमांची माहिती दिली. 

टॅग्स :रमेश बैसशेती क्षेत्रशेतकरीशेती