दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. ते पीकही चांगले उगवून आले. यातच आता मागील काही दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे. बदलत्या वातावरणात उरलेले हरभरा पीकही हातातून जाण्याची भीती आहे. त्यातच कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
असे करा हरभरा पिकातील घाटे अळी व मर रोगाचे व्यवस्थापन
यंदा खरिपात पाऊसमान कमी झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली नाही. परिणामी, विहिरीतील पाणीपातळी वाढली नाही. रब्बीच्या पेऱ्यात घट झाली. ज्यांच्याकडे थोडीफार सिंचनाची सोय होती, अशांनीच जवळपास १५ हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी केली. पीकही चांगले आले होते. परंतु काही दिवसांपूर्वी सलग चार ते पाच दिवसजोरदार पाऊस झाला. यामुळे शेकडो हेक्टरवरील हरभरा पिकाचे नुकसान झाले. ज्या ठिकाणी पाणी साचले, तेथील हरभऱ्याचे पीक जळून गेले. शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी करून पीक चांगले केले. तर काहींना दुबार पेरणी करावी लागली. आता पीक चांगले आले आहे. परंतु ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, त्याचा फटका हरभऱ्याला बसत आहे.
हरभऱ्याची भाजी बाजारातून झाली गायब,चटकदार आंबट चवीची खवैय्यांना प्रतिक्षा
मागील वर्षीप्रमाणे मी डॉलर हरभऱ्याची पेरणी केली आहे. कमी खर्चात व कमी पाण्यात येणारे हे पीक आहे. शिवाय, मेहनतदेखील कमी लागते. दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा मोठा फटका हरभरा पिकाला बसला काही आहे. त्यातून बाहेर पडत नाही तोच पुन्हा ढगाळ वातावरण आता शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. हरभरा पीक निसर्गाच्या असमतोलपणामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. -अमोल पवार, दानापूर