Lokmat Agro >शेतशिवार > वेचणी आधीच हंगाम निसटला, शेतकऱ्यांना पांढरे सोने रडवणार

वेचणी आधीच हंगाम निसटला, शेतकऱ्यांना पांढरे सोने रडवणार

The harvesting season has already passed, the farmers will cry on cotton | वेचणी आधीच हंगाम निसटला, शेतकऱ्यांना पांढरे सोने रडवणार

वेचणी आधीच हंगाम निसटला, शेतकऱ्यांना पांढरे सोने रडवणार

सोयगाव तालुक्यातील स्थिती

सोयगाव तालुक्यातील स्थिती

शेअर :

Join us
Join usNext

वेचणीच्या आधीच कपाशीची बोंडे काळवंडली असून, या कापसावर यावर्षी दिवाळी आनंदात साजरी करण्याचे बळीराजाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शासनाच्या मदतीचाच आधार आहे.

सोयगाव तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात ३३ हजार ४९९ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पिकाची वाढ व्यवस्थित झाली नाही.सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस गायब झाल्याने परतीच्या पावसावर पीक परिस्थिती सुधारण्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. आता शेतशिवारात कापसाचे बोंड काळे पडू लागले आहे.

कापूस गेला वाळून

 उत्पन्नाच्या आधारावर हा पीक पाऊस गायब झाल्याने परतीच्या विभागाने गेल्या महिन्यात जिल्ह्यातील कापणी प्रयोग घेऊन सुधारित पैसेवारी पावसावर पीक परिस्थिती खरीप पिकाची नजर अंदाज आणेवारी ठरविली जाते.त्यानंतर गाव समितीच्या सुधारण्याच्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाहीर केली. त्यात सोयगावची समोर हा अहवाल सादर केला जातो. फोल ठरल्या आहेत.  कृषी विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील १८ हजार ५६६ हेक्टरवरील कपाशी पिकाची बोंडे काळी पडल्याचे समजते. शिवाय शेकडो हेक्टरवरील कापूस वाळून जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे. महसूल विभागाने गेल्या महिल्यात जिल्ह्यातील खरीप पिकाची नजर अंदाज आणेवारी जाहीर केली.

त्यात सोयगावची आणेवारी 48 पैसे आली आहे त्यामुळे तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे हे प्रथम दृष्ट्या समोर आले आहे . त्यानुसार आता 15 ऑक्टोबर रोजी तालुक्यात पीक कापणी प्रयोग होणार आहे . त्यासाठी कृषी महसूल आणि पंचायत विभागाच्या पथकांनी पीक कापणी प्रयोगासाठी तयारी चालवली आहे. 

कशी ठरवतात पैसेवारी ?

उत्पन्नाच्या आधारावर हा पीक कापणी प्रयोग घेऊन सुधारित पैसेवारी ठरवली जाते. त्यानंतर गाव समितीच्या समोर अहवाल सादर केला जातो केला. त्यानंतर गाव पीक कापणी समितीच्या गावाच्या पैसेवारीवर स्वाक्षरी घेऊन तालुक्याची सरासरी पैसेवारी घोषित करण्यात येते. मंडळ अधिकारी हे पीक कापणी गाव समितीचे अध्यक्ष असतात.
 
अग्रिमच्या यादीतून तालुका वगळला

■ सोयगाव तालुक्यात पावसाळ्यात सलग २० दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. शासनाच्या निकषानुसार २५ टक्के अग्रिमसाठी २१ दिवसांचा खंड पडणे आवश्यक आहे.

■ केवळ एका दिवसामुळे सोयगाव तालुका अग्रीमच्या निकषात बसत नसल्याचे पीक विमा कंपनीचे म्हणणे आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निकषात शिथिलता देण्यात येईल, असे सांगितले होते.

■ त्यामुळे तालुक्यातील पीक परिस्थिती समाधानकारक नसल्याने २० दिवसांचा पावसाचा खंड अग्रिमसाठी ग्राह्य धरून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Web Title: The harvesting season has already passed, the farmers will cry on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.