Join us

हत्तींचा कळप परत जाईना, शेतकऱ्यांना चैन पडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2023 8:52 PM

शिवरामटोला, भरनोली येथील शेतपिकांचे नुकसान : वन विभागाने वाढविली गस्त

 मागील आठ दिवसांपासून हत्तींच्या कळपाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरात धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (दि. (१९) रात्री या कळपाने उमरपायलीपासून ५ कि. मी. अंतरावर असलेल्या शिवरामटोला, भरनोली, राजोली या परिसरातील शेतशिवारात धुमाकूळ घालून २० शेतकऱ्यांच्या शेतातील धानाच्या पर्ह्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. परिणामी शेतकऱ्यांवर खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. हत्तींचा कळप या परिसरातून परत जात नसल्याने नुकसानाच्या चिंतेने शेतकऱ्यांना चैन पडत नसल्याचे चित्र आहे.

यापूर्वीही पश्चिम बंगालमधून २५ ते ३० हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झाले होते. दोन महिने या कळपांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. एका शेतकऱ्याचा बळीही घेतला होता. एका शेतकऱ्याला गंभीर जखमी केले होते तर नागणडोह येथील २० ते २५ झोपड्या भुईसपाट केल्याने तेथील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेऊन राहण्याची वेळ आली. त्यानंतर हा कळप पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातील कळपाने जंगलात परत गेला होता. मात्र, आठ दिवसांपूर्वी हा कळप पुन्हा गोंदिया जिल्ह्यात दाखल झाला आहे.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली येथे या कळपाने शेतशिवारात धुमाळ धुमाकूळ घालून धनाच्या पर्ह्यांचे नुकसान केले. त्यानंतर या कल्पने आपला मोर्चा उमरपैली पासून पाच किमी अंतरावर असलेल्या शिवरामटोला, राजोली, भरनोली  या गावांकडे वळविला आहे. शेतशिवारात धुमाकूळ घालून धानाच्या पर्ह्यांचे शेतशिवारात धुमाकूळ घालून धानाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे रोवणीसाठी पर्हे आणायचे कुठून? मोर्चा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण उमरपायलीपासून पाच किमी अंतरावर झाला आहे. खरीप हंगामाची कामे असलेल्या शिवरामटोला, राजोली, करायची की हत्तींच्या कळपासाठी भरनोली या गावांकडे वळविला आहे. जागरण करायचे, अशी बिकट समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे.

 

शिवरामटोला येथील शेतशिवारात हत्तीच्या कळपाने धुमाकूळ असे धानपिकाचे नुकसान केले.

या शेतकऱ्यांवर हंगामाला मूकण्याची वेळ

 हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून धानाच्या ह्यांचे नुकसान केले. त्यामुळे रोवणीसाठी पन्हे आणायचे कुठून? असा प्रश्न सखाराम कुंभरे, दातच कुंभरे, कृष्णा कुंभरे, भगवान वट्टी, ग्यानीराम नरेटी, मंसाराम नरेटी, नानू नरेटी, रतिराम गावळे, अतिराम नरेटी, तितराम होळी, पारबता कोटंगे, सुनील बुद्धे, देविदास कोरेटी, रामबत्ती गावळे या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

वन विभागाने वाढविली गस्त

 हत्तींच्या कळपाने नुकसान केलेल्या धानाच्या पह्यांची वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. तेलंग, ए. शेतकयांसमोर निर्माण झाला आहे. आर. मेश्राम, वनरक्षक वाय. जी. परशुरामकर यांनी गुरुवारी (दि. २०) घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच पंचनामे करून नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला आहे. शिय- रामटोला, राजोली, भरनोली या परिसरातील वन विभागाची गस्त वाढविण्यात आली आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपीकपीक व्यवस्थापन