Join us

राज्यातील बागायतदारांनी सांगलीच्या शेतकरी मेळाव्यात घेतले तज्ञांचे मार्गदर्शन

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 02, 2023 8:25 PM

सांगली जिल्ह्यात राज्यभरातील बागायतदार शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी मेळाव्यात वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन घेतले.  या वर्षीचा हा भव्य कार्यक्रम 30 जुलै रोजी मणेराजुरी ...

सांगली जिल्ह्यात राज्यभरातील बागायतदार शेतकऱ्यांनी एकत्र येत शेतकरी मेळाव्यात वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन घेतले.  या वर्षीचा हा भव्य कार्यक्रम 30 जुलै रोजी मणेराजुरी येथे 'तासगांव चमन समूह' महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी स्वखर्चाने आणि मोठ्या संख्येने शेतकरी या मेळाव्यात उपस्थित राहतात व  चर्चेतून  सुलभ मार्ग काढतात.  

सांगली जिल्ह्यात द्राक्ष शेती खुप मोठ्या प्रमाणात केळी जाते. तासगांवचे कृषी पदवीधर आणि द्राक्ष बागायतदार असलेले श्री रमेश माईणकर यांनी 5 वर्षा पूर्वी तासगाव चमन समूह नावाने द्राक्ष बागायतदारांना व्हाटसअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणले. त्यांच्या ग्रुपवर नेहमी शंका निरसन करण्यासाठी चर्चा चालू असतात. हे सर्व बागायतदार दरवर्षी मोठ्या संख्येने आणि एकत्र येऊन  वेगवेगळ्या तज्ञांचे मार्गदर्शन घेतात. शेतकरी मेळावा उत्साहात झाला. 'तासगांव चमन समुहाचा हा तिसरा शेतकरी मेळावा होता या वेळी संपूर्ण राज्यातून द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधव उपस्थित होते.  

या कार्यक्रमासाठी इंटरनॅशनल होर्टी कल्चर कॉग्रेसचे असलेले जाणकार आणि बागायतदार श्री. विभाकर (मामा) पाटील यांची मुख्य उपस्थिती होती. या कार्यक्रमात त्यांना तासगांव चमन समूह, महाराष्ट्र राज्य 'द्राक्ष महर्षी 'या उपाधीने गौरविण्यात आले. जमिनीचे आरोग्य आणि समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अभ्यास करण्याचा कानमात्र त्यांच्या मार्गदर्शनात त्यांनी दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश आनंदराव माईनकर, संचालक तासगाव चमन समूह यांनी सर्व शेतकरी एकत्र येवून द्राक्षक्रांती करण्याचे आवाहन केले. 

श्री. सुनिल पवार (खजिनदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ) यांनी संघामार्फत दिल्या जाणाऱ्या माहितीचा ऊहापोह केला. श्री. संजय बरगाळे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ सांगली) श्री. चंद्रकांत लांडगे (चेअरमन महा.विज्ञान समीती) यांनी अनावश्यक वाढ नियंत्रकाचा वापर टाळण्याचे आवाहन केले. जमीन-पीक-जिवाणू यांचा असलेला परस्पर संबंधावर डॉ. प्रकाश माळी (जीवाणू तज्ञ, खेती-बड्डी) यांनी प्रकाश टाकून बागायतदारांना जीवाणूचे महत्व अधोरेकीत केले.या कार्यक्रमास श्री. विजय जाधव (गॅलक्सी केअर), श्री. विश्वास नेहे-पाटील (हायड्रोपोनिक रिसर्च सेंटर), श्री. मारूती चव्हाण (ऋषी अँग्रो रिसर्च सेंटर), श्री. शिवानंद नेजी (अमिकस अँग्रो), श्री. प्रदीप चौदिकर (फायलो) इ. तज्ञांनी शेतकरी बांधवाना द्राक्षशेतीविषयी  मार्गदर्शन केले. या विशेष शेतकरी मेळाव्याचे सुत्रसंचालन डॉ. एन.डी.पाटील व श्री. प्रविण कोरे यांनी केले. हा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तासगाव चमन समुहाची अॅडमीन टीम आणि मणेराजूरीतील शेतकरी वर्गाचे मोठे सहकार्य मिळाले. 

 

टॅग्स :शेतकरीशेतीसांगलीपीकपीक व्यवस्थापन