राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार, महावितरणच्यावीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही १० टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे.
त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना वीजग्राहकांना १ महावितरणच्या एप्रिलपासून वीजदरवाढीचा 'शॉक' बसणार आहे. परिणामी, वीज बिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.
राज्यातील विजेचे दर देशात सर्वाधिक असतानाच, 'महावितरण'ने गेल्या वर्षी सादर केलेली वीज दरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली. त्यानुसार, वीजदरात सरासरी २१.६५ टक्क्यांची वाढ झाल्याचा दावा वीजग्राहकांच्या संघटनांनी केला होता.
त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षांत (२०२३- २४) वीज बिलात सरासरी ७.२५ टक्के, तर या आर्थिक वर्षांत (२०२४-२५) वीज बिलात ७.५० टक्के अशी एकूण सरासरी १४.७५ टक्के वाढ झाली आहे.
स्थिर आकारातही गेल्या वर्षी दहा आणि यंदाच्या वर्षी दहा अशी वीस टक्के वाढ झाल्याचे वीजग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. घरगुतीसह व्यापारी, शेतकरी, उद्योग अशा सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना हा वीज दरवाढीचा झटका बसणार आहे.
लघुदाब घरगुती ग्राहकांच्या वीजदरात वाढ
वीजवापर (युनिट्स) | २०२३-२४ चे प्रति युनिट दर (वीज आकार वहन आकार) | २०२४-२५ चे प्रति युनिट दर (वीज आकार वहन आकार) |
० ते १०० | ५.५८ रुपये | ५.८८ रुपये |
१०१ ते ३०० | १०.८१ रुपये | ११.४६ रुपये |
३०१ ते ५०० | १४.७८ रुपये | १५.७२ रुपये |
५०१ ते १,००० | १६.७४ रुपये | १७.८१ रुपये |
स्थिर आकारात वाढ
वर्गवारी | २०२३-२४ | २०२४-२५ |
लघुदाब घरगुती | ११६ रुपये (प्रति महिना) | १२८ रुपये (प्रति महिना) |