Lokmat Agro >शेतशिवार > या झाडाच्या लाकडास प्रतिटन ९०,००० रूपये इतकं बाजारमुल्य, वाचा सविस्तर

या झाडाच्या लाकडास प्रतिटन ९०,००० रूपये इतकं बाजारमुल्य, वाचा सविस्तर

The market price of the wood of this tree is Rs. 90,000 per tone, read more | या झाडाच्या लाकडास प्रतिटन ९०,००० रूपये इतकं बाजारमुल्य, वाचा सविस्तर

या झाडाच्या लाकडास प्रतिटन ९०,००० रूपये इतकं बाजारमुल्य, वाचा सविस्तर

रत्नागिरीमध्ये असणाऱ्या अत्यंत पोषक वातावरणामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खैर प्रजातींच्या रोपांच्या शेतीला चांगल्याप्रकारे वाव आहे.

रत्नागिरीमध्ये असणाऱ्या अत्यंत पोषक वातावरणामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खैर प्रजातींच्या रोपांच्या शेतीला चांगल्याप्रकारे वाव आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये असणाऱ्या अत्यंत पोषक वातावरणामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खैर प्रजातींच्या रोपांच्या शेतीला चांगल्याप्रकारे वाव आहे. त्यामुळे खैराची लागवड वाढवी, यासाठी पुढच्या वर्षी वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून खैराची रोपे मोफत दिली जाणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.

परिपक्व आणि मोठ्या खैर झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. खैराच्या लाकडापासून कात तयार होतो. तसेच इमारतीसाठी लाकूड, पानांचा उत्तम चारा म्हणून वापर, कोळसा तयार करण्यासाठी, विविध औषधी गुणधर्मावर साल, फुले, डिंक, लाख यांचा वापर होतो.

त्यामुळे खैराचे झाड हे कोकणातील नारळीच्या झाडाप्रमाणे कल्पतरू असे आहे. शेतकऱ्यांनी खैर झाडे शेती शाश्वतरित्या केल्यास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कात उद्योगांना चालना मिळेल, स्थानिक लोकांना कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व इतर जिल्ह्यातून आणि परराज्यांतून खैर लाकूड आयात करावे लागणार नाही.

खैर शेतीतून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळून आर्थिक सुबत्ता वाढू शकेल आणि कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. खैर रोपांची लागवड प्रतिवर्षी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी केल्यास येणाऱ्या काळात जिल्हा खैर लाकडासाठी स्वावलंबी बनेल.

सध्या खैर लाकडास प्रतिटन रक्कम ९०,००० रूपये बाजारमुल्य आहे. खैर शेतीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्यामार्फत शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.

पुढील वर्षी २०२५ च्या पावसाळ्यामध्ये लागवड करण्यासाठी मोफत रोपांची नोंदणी येत्या १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वन व सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी यांच्याकडे करावी.

जेणेकरून आवश्यक तालुकानिहाय रोपवाटिकांचे नियोजन करून खैर रोपे वेळेत मोफत शेतकऱ्यांना वाटप करण्यात येतील, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

खैर रोपांच्या मागणी आणि नोंदणीसाठी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग, रत्नागिरी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Web Title: The market price of the wood of this tree is Rs. 90,000 per tone, read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.