Lokmat Agro >शेतशिवार > सातपुड्यातील नैसर्गिक गोडव्याला मिळणार दाम; कात्री गावाने सीताफळ प्रक्रिया उद्योगाला घातली गवसणी

सातपुड्यातील नैसर्गिक गोडव्याला मिळणार दाम; कात्री गावाने सीताफळ प्रक्रिया उद्योगाला घातली गवसणी

The natural sweetness of Satpura will fetch a price; Katri village has given a boost to the Sitafruit processing industry | सातपुड्यातील नैसर्गिक गोडव्याला मिळणार दाम; कात्री गावाने सीताफळ प्रक्रिया उद्योगाला घातली गवसणी

सातपुड्यातील नैसर्गिक गोडव्याला मिळणार दाम; कात्री गावाने सीताफळ प्रक्रिया उद्योगाला घातली गवसणी

स्थलांतर रोखत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्यदर्शन शेतकरी गटाच्या (Farmer Group) माध्यमातून कात्री (ता. धडगाव) येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग (Food Processing) सुरू झाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार केले जात असून ते देशभरातील व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जात आहे.

स्थलांतर रोखत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्यदर्शन शेतकरी गटाच्या (Farmer Group) माध्यमातून कात्री (ता. धडगाव) येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग (Food Processing) सुरू झाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार केले जात असून ते देशभरातील व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जात आहे.

शेअर :

Join us
Join usNext

स्थलांतर रोखत रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी सूर्यदर्शन शेतकरी गटाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील कात्री (ता. धडगाव) येथे सीताफळ प्रक्रिया उद्योग सुरू झाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध पदार्थ तयार केले जात असून ते देशभरातील व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जात आहे. त्यामुळे अवघा भारत अनुभवणार सातपुड्यातील नैसर्गिक गोडव्याची चव अन् या गोडव्याला आश्वासक दामही मिळणार.

स्थलांतर रोखण्याच्या उद्देशानेच कात्री गावात सूर्यदर्शन शेतकरी गटाची स्थापन झाली. ३६० शेतकरी सभासदांच्या या गटाच्यामार्फत कृषी विकास, शेळीपालन, दुग्धोत्पादन व अन्य शेतीपूरक व्यवसायांसाठी भव्य प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात आले आहे. या उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले.

अखिल महाराष्ट्र सीताफळ उत्पादक, प्रशिक्षण व संशोधन संघाचे अध्यक्ष श्याम गटांनी, सचिव अनिल बोंडे, संचालक डॉ. बी. डी. जडे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, आत्माचे नोडल अधिकारी प्रदीप लाटे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, सूर्यदर्शन शेतकरी गटाचे चेअरमन संदीप वळवी आदी उपस्थित होते.

कात्री परिसरातील भाग उंच- सखल असल्याने प्रगत शेती करता येत नाही. याच पट्टयामध्ये सीताफळ लागवड करीत त्यावर प्रक्रिया केल्याने उत्पन्नात वाढ करता येईल. याशिवाय पहाडातील व अन्य सीताफळाच्या गुणातील फरक स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न आहे. - संदीप वळवी, सरपंच, कात्री.

दीड वर्ष साठवून ठेवता येतो गर

■ २२ क्चिटल सीताफळातून ७ क्विंटल पल्प (गर) मिळू शकते. हे गर फ्रिजिंगला ठेवल्यानंतर ३० तासांत ते अगदी दगडासारखे कडक बनते. ते दीड वर्षांपर्यंत कुठल्याही परिस्थितीत खराब होत नसते. त्यावर प्रक्रिया करून कुल्फी, जेली, रबडी, आईस्क्रीम, शेक हे पदार्थ तयार करण्याचे नियोजन केले जात आहे. शिवाय मोठ्या शहरांमधील आईस्क्रीम कंपन्या संपर्क साधत असल्याचे वळवी यांनी सांगितले.

हेही वाचा : Health Benefits of Tamarind : अबब केवळ एका चिंचेचे किती 'हे' आरोग्यदायी फायदे  

Web Title: The natural sweetness of Satpura will fetch a price; Katri village has given a boost to the Sitafruit processing industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.