Lokmat Agro >शेतशिवार > सरकी बियाण्याचे दर वाढले, एका बॅगसाठी आता द्यावे लागणार एवढे पैसे..

सरकी बियाण्याचे दर वाढले, एका बॅगसाठी आता द्यावे लागणार एवढे पैसे..

The price of Sarki seeds has increased, now you have to pay this much for a bag.. | सरकी बियाण्याचे दर वाढले, एका बॅगसाठी आता द्यावे लागणार एवढे पैसे..

सरकी बियाण्याचे दर वाढले, एका बॅगसाठी आता द्यावे लागणार एवढे पैसे..

चढ्या भावाने बियाणे विक्री केल्यास कारवाई

चढ्या भावाने बियाणे विक्री केल्यास कारवाई

शेअर :

Join us
Join usNext

सरकारच्या नियंत्रणातील बीटी कापूस बियाणांच्या दरात यंदा १३ रुपये प्रतिपाकीट वाढ झाली आहे. बीटी कॉटन सीडच्या एका पाकिटासाठी शेतकऱ्यांना आता ८६४ रुपये मोजावे लागतील.वाढलेल्या दरामुळे बियाणे कंपन्यांच्या तिजोरीमध्ये यंदा अतिरिक्त पाच कोटी ४६ लाख रुपयांची भर पडणार आहे.

विभागीय कृषी सहसंचालकांच्या अधिपत्याखालील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत ९ लाख ८३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रासाठी सुमारे ४२ लाख सरकी बियाणे पाकिटांची गरज आहे. कृषी विभागाने सीड कंपन्यांकडे सरकी पाकिटांची आगाऊ मागणी नोंदविली आहे. यामुळे खरीप हंगामाचा बाजार काबीज करण्यासाठी सीड कंपन्यांनी बाजारात सरकी बियाण्यांची लाखो पाकिटे त्यांच्या गोडावूनमधून कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचवल्या आहेत.

चढ्या भावाने बियाणे विक्री केल्यास कारवाई

कृषी विभागाकडून सरकी बियाणांची सुमारे ४२ लाख पाकिटे बाजारात उपलब्ध करण्यात येत आहेत. बियाणे कंपन्यांही मुबलक प्रमाणात बाजारात बियाणे उपलब्ध करत आहेत. प्रतिपाकीट ८६४ रुपये दर निश्चित केला असून, कोणत्याही व्यापाऱ्याने चढ्या दराने बियाणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाईचा इशारा विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी दिला.

बीटी कापूस बियाण्यांच्या दरावर सरकारचे नियंत्रण असते. यामुळे गेल्या काही वर्षांपासून सरकी बियाणांचे दर गतवर्षीपर्यंत 'जैसे थे' होते. गतवर्षी सरकी बियाणांच्या एका पाकिटाचा दर ८५३ रुपये होता. यावर्षी प्रतिपाकीट १३ रुपयांची वाढ करून ८६४ रुपये केली आहे. वाढलेल्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या खिशाला सुमारे ५ कोटी ४६ लाख रुपयांची झळ बसणार आहे.

कपाशी बियाणे विकत घ्या; पण १ जूननंतरच पेरा...

सरकी बियाणे विक्रीवरील बंदी यावर्षी उठवली आहे. त्यामुळे व्यापारी आता शेतकऱ्यांना या बियाणाची विक्री करू शकतात. मात्र, ३० मेपूर्वी कपाशीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना मनाई आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे निर्देश आहेत.

कपाशीचे पीक शेतात सात महिन्यां वर उभे ठेवल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव दुप्पट होतो. कपाशीची लागवड मेमध्ये केल्यास अळीच्या पुनरुत्पादन साखळीला जीवदान मिळते. यामुळे गतवर्षीपर्यंत बियाणांची ३० मेपर्यंत विक्री करण्यास मनाई आदेश होते.

बियाणे विक्रीला परवानगी

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गतवर्षी ३० मेपर्यंत सरकी बियाणे विक्रीस मनाई होती. यंदा शासनाने बंदी उठवली आहे. व्यापारी बियाणे विक्री करू शकतात; परंतु शेतकऱ्यांना १ जूननंतरच सरकीची लागवड करण्यास परवानगी आहे.- अंकुश काळुसे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी, कृषी सहसंचालक कार्यालय

Web Title: The price of Sarki seeds has increased, now you have to pay this much for a bag..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.