Lokmat Agro >शेतशिवार > पावसाने उघडीप दिली आहे, जमिनीत ओलावा कसा टिकवून ठेवाल ?

पावसाने उघडीप दिली आहे, जमिनीत ओलावा कसा टिकवून ठेवाल ?

The rain has stoped, how to retain moisture in the soil? | पावसाने उघडीप दिली आहे, जमिनीत ओलावा कसा टिकवून ठेवाल ?

पावसाने उघडीप दिली आहे, जमिनीत ओलावा कसा टिकवून ठेवाल ?

पावसाने उघडीप दिली आहे अशा परिस्थितीत पिकांची आंतरमशागत करणे महत्वाचे आहे, जेणेकरून जमिनीत ओलावा टिकून राहील.

पावसाने उघडीप दिली आहे अशा परिस्थितीत पिकांची आंतरमशागत करणे महत्वाचे आहे, जेणेकरून जमिनीत ओलावा टिकून राहील.

शेअर :

Join us
Join usNext

पावसाने दिलेल्या उघडीपमध्ये आंतरमशागतीची कामे करून घ्यावी सध्या जिल्ह्यात पावसाने उघडीप घेतलेली पाहायला मिळत आहे. अशा परिस्थित पिकांची आंतरमशागत करणे महत्वाचे आहे, जेणेकरून जमिनीत ओलावा टिकून राहील.

आंतरमशागतीचे कामे
१) पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तसेच मातीतील ओलावा टिकवण्यासाठी डवरणी करणे गरजेची आहे. तणांच्या प्रादुर्भावानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार साधारणतः २ ते ३ डवरणी करणे आवश्यक आहे, सद्यस्थितीत डवरणी करून घ्यावी.
२) शेतामंध्ये योग्य डवरणी किंवा निंदणी/खुरपणी झाली नसेल त्या ठिकाणी मुळांना खेळती हवा मिळत नाही, यामुळे मुळे पाहिजे तसा अन्नद्रव्य व ओलावा झाडांना देऊ शकत नाही.
३) सोयाबीन पिकाची लागवड रुंद वरंबा सरीवर (बीबीएफ यंत्राने) केली असल्यास रिकाम्या सरीमध्ये तण राहणार नाही याची काळजी घ्यावी.
४) ज्या शेतकरी बांधवानी रुंद वरंबा सरीवर (बीबीएफ यंत्राने) पेरणी केली नसल्यास, डवरणी नंतर प्रत्येक तिन ओळीनंतर डवऱ्याच्या जानकुळास दोरी बांधून खोल डवरणी करावी, जेणेकरून पावसाचे जास्तीत जास्त पाणी मुरेल व अतिरिक्त पाणी शेताच्या बाहेर निघून जाईल.
५) सद्याची परिस्थितीत निंदण करण्यास एकदम अनुकूल आहे, म्हणून निंदणी करून घ्यावी. निंदणी करतांना निघालेले गवत हे पिकांच्या दोन ओळीत आच्छादन म्हणून वापरा. आच्छादनामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहील. तणांचा प्रादुर्भाव कमी करणे, जमिनीचे तापमान नियंत्रित राखणे इत्यादींचा फायदा होतो.
६) पेरणी झाल्यानंतर पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार नत्रयुक्त खतांचा वापर करावा. निंदणी/खुरपणी किंवा डवरणी झाल्यानंतर खत मातीत मिसळेल अशा पद्धतीने द्या. परंतु पिकाला खत देतांना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे.
७) आंतरमशागतीची कामे झाल्यावर तूर, कपाशीमध्ये प्रत्येक ओळीत किंवा दर दोन ओळीनंतर सऱ्या काढा. या सऱ्या मुळे सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उपयोग होतो.
८) तणनाशकांच्या वापरानंतर ८ ते १० दिवसांनी शेतात डवरणी करणे आवश्यक असते.
९) पावसाने दिलेल्या उघडीप मुळे पिके पिवळी पडत असल्यास दोन टक्के युरियाची म्हणजेच १०० ग्राम युरिया १० लिटर पाण्यात मिसळुन फवारावा.
१०) भाजीपाला पिकांमध्ये आवश्यकतेनुसार डवरणी करून पीक तणविरहित ठेवा. फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर लावा म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत. आवश्यकतेनुसार वर खतांच्या मात्रा द्या. वेलींना वळण देण्यासाठी ताटी उभारू शकता. यातून भाजीपाला वाढण्यास मदत होईल.

डॉ. जीवन कतोरे
वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला कृषि विज्ञान केंद्र, वर्धा (सेलसुरा)

८२७५४१२०१२
 

Web Title: The rain has stoped, how to retain moisture in the soil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.