Join us

भात काढणीची लगबग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 4:03 PM

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यांमध्ये भातशिवारे भात काढणीसाठी सज्ज झाली आहेत. आदिवासी बांधवांची भात काढणीची लगबग सुरू आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात.

पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३.८०० हेक्टर क्षेत्रापैकी ५,१०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भात लागवड केली जाते. सध्या या खान्यांमध्ये भातशिवारे भातरोपे काढण्यासाठी सज्ज झाली असून गत वर्षापेक्षा आदिवासी बांधव हा प्रत्येक वर्षी रोहिणी व मृग नक्षत्रांच्या कात्र्यांमध्ये हा शुभमुहूर्त समजून धूळवाफेत पेरण्या करत असतो दरवर्षीप्रमाणे चालू वर्षीही आदिवासी बांधवांनी या रोहिणी व मृग नक्षत्रांच्या

कात्र्यांमध्ये काही ठिकाणी धूळवाफेत तर काही ठिकाणी चिडवाफेत पेरण्या उरकून घेतल्या. गतवर्षीपेक्षा चालू वर्षी रोहिणी, मृग नक्षत्रांपाठोपाठ आर्द्रा व पुनर्वसु (कोर) या नक्षत्रातही सुरुवातीपासूनच पावसाने चांगलीच साथ दिल्याने भात पेरणी केलेला वरचा दाणा व मातीआड झालेला दाणा उतरून येऊन भात रोपे चांगल्याप्रकारे तरारू लागल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी लागवडी उरकून घेतल्या. यानंतर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी भात रोपे सडून गेली तर काही ठिकाणी बांध फुटून भात खाचरे गाडली गेली.

यानंतर दाट धुके व रोगी वातावरणामुळे या भातपिकांवर करपा तांबेरा व खोड किडा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या रोगांचा आदिवासी शेतकरी सामना करतो ना करतो तोच भीमाशंकर पाटण व आहुपे खोऱ्यामध्ये मागील आठवड्यामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले. यामुळे भातपिकाचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. सध्या भातशिवारे ही भात काढणीसाठी सज्ज झाली. आदिवासी बांधवांची भात काढणीची लगबग सुरू आहे.

उदरनिर्वाहाचे एकमेव साधन

  • भीमाशंकर पाटण व आहुपे ही तीन खोरी मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजली जातात. या भागामध्ये राहणारा आदिवासी बांधव हा या पडणाया पावसाच्या जोरावर भात हे एकमेव पीक घेतो. भातशेती हेच या भागातील आदिवासी शेतकयांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्यामुळे त्यांच्या जीवनाचा तो मुख्य आधार समजला जातो. गेले. कित्येक वर्षांपासून निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भातशेती संकटात सापडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
  • बारा महिने मोठ्या आशेने काबाडकष्ट करून ऐनवेळी होणाचा निसर्गचक्राच्या अवकृपेमुळे भात उत्पादनवाढीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. अलीकडील काळामध्ये भात या पिकाला पाऊस शेवटपर्यंत पुरत नसल्यामुळे आदिवासी शेतकरी सर्रास हळव्या भातपिकांच्या जाती करणे पसंत करीत आहेत. तर चालू वर्षी याउलट होऊन प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीकाढणी