Join us

ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांचा पगार वाढला; आता महिन्याला मिळणार 'एवढे' मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 9:15 AM

ग्रामपंचायतीची (grampanchayat) धुरा सांभाळणाऱ्या सरपंच (sarpanch) व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने (Goverment) दुप्पट वाढ केली आहे.

ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली आहे. आता सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे.

याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांना अतिशय कमी मानधन दिले जात होते.

त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून केली जात होती. गावाचा कारभार हाकणारे सरपंच, उपसरपंच यांचे मानधन वाढावे म्हणून कित्येक वर्षांपासून ही मागणी केली जात होती.

आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये अॅड व्हायचं आहे मग 'इथे' क्लिक करा.!

वाढीव मानधन

लोकसंख्यामानधन
० ते २०००६००० (सरपंच) २००० (उपसरपंच)
२००० ते ८०००८००० (सरपंच) ३००० (उपसरपंच)
८००० हून जास्त१०,००० (सरपंच) ४००० (उपसरपंच)

● सरपंचांसह उपसरपंचांना मानधन वाढवून मिळावे, यासाठी अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. आता हे मानधन वाढवून मिळणार असल्याने सरपंचांसह उपसरपंचांना दिलासा मिळाला आहे.

 

सरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. या पदाला साजेशे मानधन राज्य शासनाने देणे अपेक्षित आहे. मानधन दुप्पट केले असले तरी जबाबदारीच्या तुलनेत सदर मानधन अतिशय कमी आहे. यापेक्षा अधिक वाडीची गरज आहे. २० ते २५ लाखांपर्यंत विकासकामे सरपंचांना मंजूर करण्याचा अधिकार असावा. - नंदू भोपी, अध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच परिषद, रायगड.

 

सरपंच, उपसरपंचांचे मानधन दुप्पट

 

● सरपंचांना १० हजारांपर्यंत आठ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या सरपंचाला १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.● पूर्वी पाच हजार मानधन होते. उपसरपंचांना चार हजारांपर्यंत सरपंचाच्या तुलनेत उपसरपंचाला अर्धे मानधन आहे. आठ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर चार हजार रुपये मिळतील.● जबाबदारीच्या मानाने अत्यल्प मानधनः पण सरपंच व उपसरपंच हे अतिशय महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे या पदाला शोभेल एवढे मानधन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अत्यंत कमी मानधन मिळते.

हेही वाचा - Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

टॅग्स :ग्राम पंचायतशेती क्षेत्रसरकारमहाराष्ट्रसरपंच