Lokmat Agro >शेतशिवार > बांधावारील जमिनीच्या वादावर तोडगा! जमिनीच्या मोजणीसाठी हे यंत्र ठरतेय फायदेशीर

बांधावारील जमिनीच्या वादावर तोडगा! जमिनीच्या मोजणीसाठी हे यंत्र ठरतेय फायदेशीर

The solution to the dispute from the land ! This machine is useful for land measurement | बांधावारील जमिनीच्या वादावर तोडगा! जमिनीच्या मोजणीसाठी हे यंत्र ठरतेय फायदेशीर

बांधावारील जमिनीच्या वादावर तोडगा! जमिनीच्या मोजणीसाठी हे यंत्र ठरतेय फायदेशीर

भाऊबंदकीचे वाद सोडवण्यासाठी सॅटेलईटने होणारी जमीन मोजणी ठरतेय फायदेशीर

भाऊबंदकीचे वाद सोडवण्यासाठी सॅटेलईटने होणारी जमीन मोजणी ठरतेय फायदेशीर

शेअर :

Join us
Join usNext

शेतीच्या वादातून बांधाबांधांवरून भाऊबंदकीत मोठे वाद निर्माण होतात. जमीन मोजणीमुळे अनेकदा हाणामाऱ्या होऊन हे वाद पराकोटीला गेल्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे त्वरित जमिनीची मोजणी करून असे वाद मिटविण्यासाठी सॅटेलाइटद्वारे होणारी मोजणी फायदेशीर ठरत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात भूमी अभिलेख विभागात सॅटेलाइटशी जोडण्यात आलेल्या आधुनिक दोन रोव्हर मशीनच्या माध्यमातून गेल्या ८ महिन्यांमध्ये १७८ पैकी १५७ शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यात आली आहे.

जमीन मोजणीची प्रकरणे वेगाने आणि अचूक होण्यासाठी राज्याच्या जमाबंदी आयुक्तालयाकडून सॅटेलाइटच्या माध्यमातून जमिनीची मोजणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी लागणारी ८०० जमीन मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) खरेदी करण्यात आली. यातील २ रोव्हर मशीन फुलंब्री येथील भूमी अभिलेख कार्यालयास मिळाल्या. त्यानंतर एप्रिल २०२३ पासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी या रोव्हर मशीनच्या माध्यमातून सुरू झाली. एप्रिल ते नोव्हेंबर या ७ महिन्यांच्या कालावधीत या कार्यालयाकडे १११८ शेतकऱ्यांनी जमीन याच रोव्हर मशीनद्वारे शेत जमिनीची मोजणी होते.

मोजणीचे अर्ज दाखल केले. त्यातील १५७ शेतकऱ्यांच्या शेतीची मोजणी सॅटेलाइटच्या माध्यमातून रोव्हर मशीनद्वारे करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या शेतजमीन मोजणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रोव्हर मशीनने कशी होते मोजणी?

रोव्हर मशीनने मोजणी करण्यासाठी 'सर्व्हे ऑफ इंडिया'च्या मदतीने मोजणी स्थानके (कॉसी उभारली जातात. त्यानुसार उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंग लहरीद्वारे मोजणी करायच्या ठिकाणांचे अक्षांश आणि रेखांश दर्शविण्यात येते. कार्सद्वारे होणारी मोजणी ही रोव्हरमध्ये साठविली जाते. त्यानंतर अक्षांश- रेखांशांवरून ऑटोकेंड संगणकप्रणालीचा वापर करून नकाशे तयार होतात. रोव्हर मशीनने दहा एकर जमिनीची मोजणी अर्धा तासात पूर्ण होते.

सॅटेलाइटच्या माध्यमातून रोव्हर मशीनद्वारे शेतजमिनीची मोजणी लवकर व अचूक होत आहे. यासाठी मनुष्यबळ कमी लागते. पीक असलेल्या शेताची मोजणी करणेही शक्य होते. एक एकर क्षेत्राची मोजणी अर्ध्या तासात करणे शक्य आहे. -चंद्रकांत सेवक, उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग

८ दिवसांत अर्ज निकाली

संबधित शेतकऱ्याने जमीन मोजणीचा अर्ज दिल्यानंतर ८ दिवसांच्या आत त्यांच्या जमिनीची मोजणी करून दिली जाते, असे या विभागाचे उपअधीक्षक चंद्रकांत सेवक यांनी सांगितले.


शेतात पीक असेल तरीही होते मोजणी

भूमी अभिलेख विभागाकडे पूर्वी जमीन मोजणीसाठी ईटीएस पद्धत होती. या पद्धतीमुळे शेतात पिके असतील, तर मोजणी करणे शक्य नव्हते. शिवाय यासाठी बराच वेळ लागत होता. आता उपगृहाच्या माध्यमातून रोव्हर मशीन उपलब्ध झाल्याने ती मशीन थेट शेतात घेऊन जाता येते. या मशीनमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत नाही. पिके असलेल्या जमिनीची सहज मोजणी केली जाऊ शकते.

Web Title: The solution to the dispute from the land ! This machine is useful for land measurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.