Join us

प्रगतीशील शेतकऱ्यांच्या मुलाने उद्योजक व्हावे; आयसीएआर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजीव काळे यांचे आवाहन

By रविंद्र जाधव | Published: August 22, 2024 6:01 PM

भारतीय अनुसंधान पारिषद नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार केव्हीके मार्फत होणाऱ्या कामाची पाहणी करण्याकरता पुणे येथील कांदा व लसूण संचालनालयाचे वरिष्ठ शात्रज्ञ डॉ राजीव काळे यांनी (दि. २१) रोजी गांधेली येथील कृषि विज्ञान केंद्र (kvk mgm gandheli) व दत्तक ग्राम पळसवाडी (ता. खुलताबाद) येथे प्रक्षेत्र भेट दिली तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

भारतीय अनुसंधान पारिषद नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार केव्हीके मार्फत होणाऱ्या कामाची पाहणी करण्याकरता पुणे येथील कांदा व लसूण संचालनालयाचे वरिष्ठ शात्रज्ञ डॉ राजीव काळे यांनी (दि. २१) रोजी गांधेली येथील कृषि विज्ञान केंद्र व दत्तक ग्राम पळसवाडी (ता. खुलताबाद) येथे प्रक्षेत्र भेट दिली तसेच यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या भेटी दरम्यान गावामध्ये 'केव्हीके'च्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावरील सोयाबीन, तूर, कपाशी, अद्रक, कांदाचाळ या पिक प्रयोगांची पाहणी करण्यात आली. तसेच घृषणेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीस भेट दिली. या ठिकाणी पळसवाडी व गोळेगाव (ता. खुलताबाद), पुरी (ता.गंगापूर), धोंदलगाव व शेरोडी (ता.कन्नड) येथील शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव कथन केले. शेरोडी येथील प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर डगळे यांनी ते तयार करत असलेल्या जैविक निविष्ठा निर्मिती व त्याच्या वापरातून वाढलेली उत्पादकता या बद्दल देखील अनुभव कथन केले. 

केव्हीके च्या मार्गदर्शनात मागील खरीप हंगामामध्ये दोन एकर क्षेत्रातून २७८ क्विंटल कांदा  उत्पादन घेतल्याचे सांगितले. तर पुरी येथील युवक शेतकरी कैलाश मोरे यांनी सांगितले की केव्हीके शेतकऱ्याकरिता नेहमी उपलब्ध असते त्यांचे कडून वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन मिळते. यासोबतच धोंदलगाव येथील श्री बळीराम वाघ यांनी सांगितले की, केव्हीकेच्या मार्गदर्शनामुळे दुष्काळात मोसंबी बाग वाचविण्याचे बळ मिळाले.

तर पळसवाडी येथील शिवाजी आवटे, विलास ठेंगळे, संतोष ठेंगळे यांनी सांगितले केव्हीकेमुळे पेरणी वेळ, खत नियोजन, पिक फेरपालट तसेच किडींची ओळख इत्यादी बाबी शिकायला मिळाल्या त्यामुळे खर्चात बचत झाली. दुष्काळात मुरघास बॅगच्या माध्यमातून चारा व्यवस्थापनाची सवय लागली असेही सांगितले.

गोळेगाव येथील काकासाहेब चव्हाण  म्हणाले की, जैविक निविष्ठाच्या पुरवठ्यामुळे तूर व अद्रक मधील मर रोगाचे नियंत्रण मिळाले तसेच अवाजवी होणारा खर्च कमी झाल्याचे सांगितले.

प्रगतीशील शेतकऱ्याच्या मुलाने वडिलांचा वारसा घेऊन उद्योजक व्हावे. शेतातील उत्पादित मालाचे पँकिंग व ब्रान्डींग करूनच विकावे असे प्रतिपादन यावेळी डॉ काळे यांनी शेतकऱ्यांना उत्तर देताना सांगितले. तर खरीप हंगामामध्ये दोन एकर क्षेत्रातून २७८ क्विंटल कांदा उत्पादन खूप कौतुकास्पद असून कांदा लसूण संचानलायाकडून सुद्धा शेतकऱ्यांना नवीन वाणाचे प्रात्यक्षिक प्लॉट देवू असे नमूद केले. सोबतच शेतकरी उत्पादक कंपनीने केव्हीकेच्या माध्यमातून कृषि निविष्ठा निर्मिती, बीज उत्पादन यामध्ये काम करावे असा सल्ला दिला.

कांदा व लसूण संचालानालायामार्फात कांदा व लसूण पिका संदर्भात दर महिन्याला मार्गदर्शिका दिल्या जातात त्या केव्हीके च्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या जातील असे नमूद केले. या शिवाय शेतकऱ्यांनी 'onion crop advisor' नावाचे अँपचा कांदा पिका संदर्भातील माहिती करिता वापर करावा असे आवाहन केले.

केव्हीके प्रक्षेत्र भेटी दरम्यान जैविक निविष्ठा निर्मिती, माती, पाणी व बीज तपासणी प्रयोगशाळा, पदार्थ निर्मिती, रोपवाटिका, मोसंबी स्पेशल व निम तेल निर्मिती प्रकल्प, प्रक्षेत्रावरील भाजीपाला उत्पादन, हर्बल व वनौषधी उद्यान, परसबाग, मधुमक्षिकापालन, शेळी व कुक्कुट पालन प्रकल्पाची पाहणी केली.

तसेच कृषि सखींच्या नैसर्गिक शेती संबधित प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रशिक्षनार्थीशी सुद्धा संवाद साधला. तसेच एमजीएम संस्थेमार्फत रेशीम धागा निर्मिती व दुग्ध प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याना उपलब्ध करून दिलेल्या बाजारपेठेबद्दल समाधान व्यक्त केले व त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की या सर्व सुविधेचा शेतकर्यांनी जास्तीत जास्त वापर करून घ्यावा.

हेही वाचा - Dairy Farmer Success Story : अल्पभूधारक अनिलरावांची दुधातून अर्थक्रांती; दूध दर कमी असतांनाही मिळतोय नफा

टॅग्स :शेती क्षेत्रऔरंगाबादमराठवाडावसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठखुल्ताबाद