Join us

तृणधान्यांवर आधारित 'अबंडन्स इन मिलेट' या गाण्याला मिळाले जागतिक दर्जाचे नामांकन

By मुक्ता सरदेशमुख | Published: November 11, 2023 3:34 PM

लहान शेतकऱ्यांसाठी तृणधान्य सुरक्षित पीक..

बाजरीवर आधारित असणाऱ्या 'अबंडन्स इन मिलेट'या  पंतप्रधानाचा समावेश असलेल्या गाण्याला जागतिक दर्जाच्या ग्रॅमी पुरस्कार २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत कामगिरी या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. मुंबईत जन्मलेली गायिका व गीतकार फाल्गुनी शाह आणि तिचा पती गायक गौरव शाह यांनी गायलेले आणि संगितबद्ध केलेले गाणे बाजरी तसेच पौष्टीक तृणधान्यांविषयी जागरुकता वाढवण्यासाठी लाँच करण्यात आले आहे.

"ले लो बाजरा जवार, ले लो रागी सालोंसाल" असे म्हणत पौष्टीक तृणधान्यांविषयी जागृकता वाढवण्याच्या हेतूने या गाण्याचे लिखाण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. अन्न सुरक्षा हा जगभरात कळीचा मुद्दा ठरत असताना या गाण्यातून दिला गेलेला तृणधान्य वापराचा संदेश महत्त्वाचा ठरत आहे. 

जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून २०२३ हे वर्ष ओळखले जात असताना जीवनशैलीचा एक भाग म्हणून बाजरीचा अवलंब करण्याविषयी तसेच बाजरीप्रमाणेच असणाऱ्या इतर पौष्टीक तृणधान्यांची लागवड आणि उपयुक्तता सांगणारे हे गीत आहे. 

इथे ऐका गाणे..

https://music.youtube.com/watch?v=oZeLaJloa5I

लहान शेतकऱ्यांसाठी अत्यंत सुरक्षित असणारे पीक आहे. उष्ण कटिबंधीय तसेच दुष्काळी वातातवरणातही उगवणारे व बदलल्या हवामाशी लवचिक असणारे हे पीक आहे.  भारतात तृणधान्यांचा जीवनशैलीचा एक भाग तसेच ज्वारी, पर्ल बाजरी, फिंगर बाजरी, फॉक्सटेल बाजरी, ब्राऊनटॉप बाजरी आणि कोडो बाजरी अशा साधारण नऊ ज्ञात पारंपरिक बाजरीचे उत्पादन केले जाते.

आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाच्या निमित्ताने जूनमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश असलेले ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. फालूच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जागतिक भूक कमी करण्यासाठी बाजरी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे बाजरीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे गाणे तयार करण्यात आले होते.अबडंन्स इन मिलेट या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीनरेंद्र मोदी