मुंबई : राज्याला दोन महिन्यांपासून पूर्णवेळ कृषी सचिव नाही. शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांच्याकडे कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यांच्याकडेच अल्पसंख्यांक विकास विभागाचाही अतिरिक्त कार्यभार आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विभागाच्या कारभारात निर्णय घेता येत नाहीत.
त्यातच पूर्णवेळ सचिव नसल्यानेही अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. राज्य सरकारने तातडीने पूर्णवेळ कृषी सचिव नेमावेत, अशी मागणी होत आहे.
आचारसंहितेचा कसलाही अडसर नाही
■ कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कुंदन यांच्याकडे तीन विभाग असले तरी कृषी खात्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे आणि त्या खात्याच्या कारभारात लक्ष घालतात.
■ मात्र, त्यांच्याकडे आणखी दोन विभाग असल्याने त्यांना पूर्णवेळ कृषी खात्यासाठी देता येत नाही.
■ आचारसंहितेचा अडसर नसल्याने पूर्णवेळ कृषी सचिव आचारसंहितेच्या काळातही देता आले असते.
■ १६ मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली होती. त्यानंतरही ८ एप्रिल, २६ एप्रिल रोजी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यातच कृषी सचिवपदी पूर्णवेळ अधिकारी नेमता आले असते.
अधिक वाचा: अवकाळीची अवकळा; राज्यात २१ जिल्ह्यांतील ६ हजार ६६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान