Join us

होरपळलेल्या केळी पिकाला दुष्काळाच्या नुकसानीतून वगळले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 3:00 PM

केळी बागा ऐन हंगामात जळत असल्याने आतापर्यंत केलेला खर्च व मेहनत वाया जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे.

आधीच पीकविम्यामध्ये समावेश न केलेले केळीपीक सध्या पावसाअभावी करपून चालले आहे. मात्र, शासनाने या पिकाचे दुष्काळ नुकसानीच्या यादीतूनही नाव वगळले आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सोयगाव तालुक्यात शहरासह बनोटी मंडळात वाडी, नायगाव, किन्ही, बनोटी, वरठाण, गोंदेगाव, दस्तपूर, काळदरी आणि वडगाव या भागात केळी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. या पिकाला पाण्याची जास्त आवश्यकता असते. मात्र, तालुक्यात यंदा दुष्काळ पडल्यामुळे सर्व तलाव, बंधारे कोरडेठाक पडले आहेत. भूगर्भातील जलसाठा घटल्याने विहिरींनीही तळ गाठला असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. केळी बागा ऐन हंगामात जळत असल्याने आतापर्यंत केलेला खर्च व मेहनत वाया जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना वाटत आहे.

केळीचे दर वाढले, उत्पादनात दोन महिन्याचा खंड पडण्याची ही पहिलीच वेळ

सोयगाव तालुक्यात अति गंभीर दुष्काळाची घोषणा होण्याआधी महसूल आणि कृषीच्या संयुक्त पथकांनी पीक स्थितीवरून सोयगाव तालुक्यातील खरिपाच्या पिकांचा दुष्काळासंदर्भात अहवाल पाठविला होता. कोरडवाहू, बागायती आणि बारमाही पिके या प्रकारात बारमाही पिकांच्या १ हजार ४२८ हेक्टरवर ११३० शेतकरी बाधित असल्याचा अहवाल पाठविला आहे; परंतु या बारमाही पिकांमध्ये केळी पिकांचा समावेश नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे केळी उत्पादकांना मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

टॅग्स :केळीपीक विमापीकशेतकरी