Lokmat Agro >शेतशिवार > सातपुड्यातील सीताफळांचा गोडवा यंदा पोहोचला परदेशात

सातपुड्यातील सीताफळांचा गोडवा यंदा पोहोचला परदेशात

The sweetness of satpura fruits reached abroad this year | सातपुड्यातील सीताफळांचा गोडवा यंदा पोहोचला परदेशात

सातपुड्यातील सीताफळांचा गोडवा यंदा पोहोचला परदेशात

बाजारपेठेत सध्या सीताफळांची खोऱ्याने आवक...

बाजारपेठेत सध्या सीताफळांची खोऱ्याने आवक...

शेअर :

Join us
Join usNext

सातपुड्यातील चवदार सीताफळांचा गोडवा यंदाही परदेशात पोहोचला आहे. शहाद्यातील व्यापारी दुर्गम भागातून सीताफळांची खरेदी करून परदेशात रवाना करत आहेत. शहादा बाजारपेठेत सध्या सीताफळांची खोऱ्याने आवक होत असून, एक कॅरेट दीड ते दोन हजार रुपयांना खरेदी होत आहे.

कोरडवाहू शेतीत सिताफळ लागवड कशी कराल?

सातपुड्यातील धडगाव व तोरणमाळ परिसरात वनक्षेत्रांसह दरीखोरीतील सीताफळांच्या झाडांना सातपुड्यात सीताफळाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात येते. यातून आदिवासींना तात्पुरत्या स्वरूपाचा रोजगार उपलब्ध होतो. सीताफळ हे पूर्णपणे सेंद्रिय फळ आहे. या भागात सीताफळ प्रक्रिया उद्योग उभारावे बाहेरच्या बाजारपेठेत सीताफळांची मार्केटिंग करण्याची आवश्यकता आहे. - कल्पेश पटेल, ग्राहक, शहादा.

यंदाही चांगला बहर आला आहे. १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने वाढलेल्या सीताफळांची चव अत्यंत गोड असल्याने त्यांना मोठी मागणी असते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सीताफळ बाजारात दाखल झाले आहेत. या सीताफळांची खरेदी शहादा शहरातील व्यापारी करतात. शहरातील जुना मोहिदा रोड, तसेच इतर ठिकाणीही सातपुड्यातील सीताफळ व्यापारी दाखल झाले आहेत. ५० ते ३०० रुपये किलोपर्यंतचे सीताफळ त्यांच्याकडे उपलब्ध आहे. शहादा बाजारात दर दिवशी २०० क्विंटलपर्यंत आवक होत असून, डिसेंबरपर्यंत आवक सुरू असेल.

Web Title: The sweetness of satpura fruits reached abroad this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.