Lokmat Agro >शेतशिवार > उन्हाचा पारा चढू लागला, फळबागा माना टाकू लागल्या

उन्हाचा पारा चढू लागला, फळबागा माना टाकू लागल्या

The temperature of summer began to rise, the orchards began to fall | उन्हाचा पारा चढू लागला, फळबागा माना टाकू लागल्या

उन्हाचा पारा चढू लागला, फळबागा माना टाकू लागल्या

यंदा पावसाअभावी अनेक गावांत आज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे फळबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. मार्चमध्येच अनेक शेतकऱ्यांच्या बागांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही बागा होरपळल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालविणे सुरू केले आहे.

यंदा पावसाअभावी अनेक गावांत आज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे फळबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. मार्चमध्येच अनेक शेतकऱ्यांच्या बागांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही बागा होरपळल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालविणे सुरू केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

दादासाहेब गलांडे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मध्यम, लघु तलावांमधील पाणीसाठा कमालीचा घटू लागला आहे. यातच उन्हाचा कडाका वाढत असल्याने फळबागांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील १४ हजार ४०० हेक्टरवरील फळबागांवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे.

तालुक्यात २०२३-२४ मध्ये तब्बल १४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर विविध प्रकारच्या फळबागांची लागवड करण्यात आली आहे. मागील तीन वर्षात शासनाच्या विविध योजनांतर्गत मोसंबी, डाळींबाच्या फळबागांसह इतर फळबागांच्या लागवडीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मोसंबी लागवड वर्षाला किमान १ हजार हेक्टरने वाढली असून, दावरवाडी, आडुळ, पाचोड, बालानगर, कडेठाण, लोहगाव, कातपूर, वाहेगावसह विविध ठिकाणी मोसंबीची सर्वांत जास्त लागवड झालेली आहे.

पेरू, सीताफळ, आंबा, पपई, चिकूचे क्षेत्रही वाढले आहे; मात्र यंदा पावसाअभावी तालुक्यातील अनेक गावांत आज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे फळबागा वाचविणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे. मार्चमध्येच अनेक शेतकऱ्यांच्या बागांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही बागा होरपळल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी पाण्याअभावी फळबागांवर कुऱ्हाड चालविणे सुरू केले आहे.

पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप

तालुक्यात २०२०-२१ मध्ये १० हजार ९२५ हेक्टर क्षेत्रावर मोसंबी लागवड झाली होती. ती २०२१-२२ मध्ये ११ हजार १५३ हेक्टरवर झाली. तर २०२३-२४ मध्ये १२ हजार २६६ हेक्टरवर झालेली आहे. तसेच कमी- जास्त प्रमाणात बोर, द्राक्षे, पेरू, लिंबू, आंबा, पपई, चिकू या फळबागाही वाढल्या आहेत.

सर्वच फळबागांमध्ये वर्षनिहाय झालेली वाढ

२०२०-२१ - १२ हजार ८५१ हेक्टर
२०२१-२२ - १३ हजार ३१५ हेक्टर
२०२३-२४ - १४ हजार ४०० हेक्टर

या वर्षात १४ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात फळबागा आहेत. दुष्काळी परिस्थितीत फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी खरड छाटणी करावी. कुठलाही बहर धरू नये. आलेली फळे तोडून टाकावी. केमिकलचा स्प्रे करावा. तसेच झाडांभोवती आच्छादन करावे. यामुळे फळबागा वाचविण्यासाठी मदत होईल, तालुक्यातील अनेक शेतकरी डाळींब लागवडीकडे वळले आहेत. - संदीप शिरसाट, तालुका कृषी अधिकारी पैठण

माझ्याकडे नऊ वर्षापासून एक हेक्टरवर ५०० मोसंबीची झाडे आहेत. आतापर्यंत वीस टैंकर विहिरीत टाकून ठिबकने पाणी दिले आहे. मात्र, उष्णता वाढल्यामुळे यापुढे आठवड्याला पंधरा ते सोळा टँकर लागणार आहेत. एक टैंकर आठशे रुपयाला मिळतो. त्यामुळे आता फळबाग वाचवावी का संसाराचा गाडा चालवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. - भागवत नाटकर, शेतकरी, कडेठाण

Web Title: The temperature of summer began to rise, the orchards began to fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.