राज्यातील बहुतांश विभागांमधील धरणे काठोकाठ भरल्याचे चित्र असताना मराठवाड्यातील दोन धरणे वगळता पाच लघु-मध्यम धरणांमधील पाणीसाठा ५० टक्क्यांच्या आत आहे. जायकवाडी धरण केवळ ३२ टक्के भरले असून पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होत नसल्याची स्थिती आहे.
मराठवाडा विभागात सात लघु-मध्यम धरणे कोरडी असल्याची स्थिती आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणीमधील निम्न दुधना, पूर्ण येलदरी ,बीडमधील माजलगाव, मांजरा,धाराशिवमधील तेरणा ,नांदेडमधील ऊर्ध्व पैनगंगा या धरणांचा समावेश आहे.
औरंगाबाद विभागात एकूण ९२० धरणे असून आजच्या घडीला सर्व धरणांमधील पाणीसाठा केवळ ३०.३७ टक्के आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा ६४.३१ एवढा होता. २० मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली असून त्यामध्ये छत्रपती संभाजी नगरमधील ४, जालन्यातील १, बीडमधील ६, लातूरमधील २, धाराशिवमधील ६ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.
हवामान विभागाने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचे असल्याची शक्यता वर्तवली आहे. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तर दिनांक २ ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, लातूर, जालना जिल्हयात तर दिनांक ३ ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.