देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल (दि. २९) केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केला. त्यामध्ये भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर मध्य प्रदेश असून, दुसन्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे.
महाराष्ट्रात १९८५ बिबट्यांची नोंद झाली आहे. देशभरात गणनेसाठी ३२ हजार ८०३ ट्रॅप कॅमेरे लावले होते, त्यातून ४ कोटी ७० लाख ८१ हजार ८८१ छायाचित्रे रेकॉर्ड झाली. त्यामध्ये ८५ हजार ४८८ छायाचित्रे बिबट्यांची होती, यामध्ये धोकादायक बाब ही आहे की, महाराष्ट्रातील ७५ टक्के बिबटे हे संरक्षित क्षेत्राबाहेर आहेत, त्यामुळे मानव-बिबट संघर्ष आणखी गंभीर होत जाणार आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्यांच्या वन विभागाच्या सहकार्याने ही गणना केली, व्याघ्र श्रेणीतील राज्यांमध्ये चतुवार्षिक 'वाघ, सह- भक्षक, शिकार आणि त्यांचे अधिवास' या अभ्यासाचा भाग म्हणून बिबट्यांच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी सर्वेक्षणाची पाचवी फेरी नुकतीच पूर्ण झाली.
बिबट्या हा काहीसा अनाकलनीय प्राणी आहे म्हणजेच त्याच्या वर्तनाचा अंदाज लावणे कठीण आहे. हा प्राणी भारतातील त्यांच्या श्रेणीमध्ये अधिवासाची हानी, मानव-वन्यजीव संघर्ष आणि शिकारीदरम्यान वाढत्या धोक्यांना तोंड देत आहे.
कॅमेरा ट्रॅपिंग, अधिवास विश्लेषण आणि लोकसंख्या व्यवस्थापन मॉडेलिंग अर्थात एखाद्या प्रजातींच्या जोखमीचा अंदाज घेण्यासाठी केलेला अभ्यास यामधून बिबट्यांचे प्रमाण कुठे किती आहे याविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
या फेरीत मांसभक्षक प्राण्यांच्या पाऊलखुणा आणि शिकारीसाठी आवश्यक विपुलतेचा अंदाज लावण्यासाठी ६,४१,४४९ किलोमीटर अंतरावरील प्रदेशाचे पायी सर्वेक्षण करण्यात आले.
भारतातील बिबट्यांची संख्या
सन २०१८ : १२,८५२
सन २०२३ : १३,८७४
बिबट्यांची राज्यांतील संख्या
मध्य प्रदेश | ३९०७ |
महाराष्ट्र | १९८५ |
कर्नाटक | १८७९ |
तामिळनाडू | १०७० |
छत्तीसगड | ७२२ |
राजस्थान | ७२१ |
उत्तराखंड | ६५२ |
केरळ | ५७० |
आंध्र प्रदेश | ५६९ |
ओडिशा | ५६८ |
उत्तर प्रदेश | ३७१ |
तेलंगणा | २९७ |
पं. बंगाल | २३३ |
बिहार | ८६ |
गोवा | ७७ |
आसाम | ७४ |
झारखंड | ५१ |
अरुणाचल प्रदेश | ४२ |
राज्यात मानव-बिबट संघर्ष वाढला आहे. उसाची शेती वाढली आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढतेय, जाहीर केलेली संख्या ट्रॅप कॅमेऱ्याची आहे, तर इतर ठिकाणी पसरलेले चिबटेही खूप आहेत. त्यामुळे हा आकडा नक्कीच अधिक होईल, वन विभागाने या ऊसातील बिबट्यांबाबत संशोधन हाती घेऊन ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे, अन्यथा भविष्यात सर्वत्र बिबट्यांचा धुमाकूळ वाढेल. पुण्यालाही आता बिबट्यांनी घेरले आहे. - प्रभाकल कुकडोळकर, चिवट अभ्यासक व माजी वन अधिकारी