Lokmat Agro >शेतशिवार > Sant Tukaram Palkhi Sohala तुकोबारायांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून करण्यात आली या बैलजोड्यांची निवड

Sant Tukaram Palkhi Sohala तुकोबारायांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून करण्यात आली या बैलजोड्यांची निवड

These bullocks were selected from among 26 bullocks to pull Tukobaraya's palanquin chariot | Sant Tukaram Palkhi Sohala तुकोबारायांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून करण्यात आली या बैलजोड्यांची निवड

Sant Tukaram Palkhi Sohala तुकोबारायांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून करण्यात आली या बैलजोड्यांची निवड

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या Sant Tukaram Palkhi Sohala वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या Sant Tukaram Palkhi Sohala वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

देहूगाव : जगद्‌गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू दरम्यानचा पालखी रथ ओढण्याची व सेवा करण्याची संधी लोहगावच्या सुरज खांदवे यांच्या हिरा व राजा आणि नांदेड गावच्या निखिल कोरडे यांच्या मल्हार व गुलाब या बैलजोडीला मिळाली आहे.

तर चौघडा गाडी ओढण्याचा माण टाळगाव चिखलीच्या बाळासाहेब मळेकर यांच्या नंद्या व संद्या जोडी मिळाला.

श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोडीतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा बैलजोडीतून २ बैल जोड्या पालखी रथासाठी व एक बैलजोडी चौघडा गाडीसाठी शोधण्यात आली.

सोमवारी रात्री उशिरा पालखी सोहळा प्रमुख व संस्थानचे विश्वस्त विशाल महाराज मोरे यांनी ही निवड केली. माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे व भानुदास महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.

सुरज ज्ञानेश्वर खांदवे हे श्री संत तुकाराम महाराजांचे आजोळ असलेले लोहगाव ता. हवेली. पुणे येथील शेतकरी असून त्यांच्या बैलजोडीचे नाव हिरा व राजा आहे. त्याचप्रमाणे नांदेड गाव ता. हवेली, पुणे येथील निखिल सुरेश कोरडे हेही शेतकरी असून त्यांनीही आपल्या मल्हार-गुलाब बैलजोडीला पालखी सोहळ्यासाठी संधी मिळावी, यासाठी अर्ज केला होता.

चिखली टाळगावमधील नंद्या, संद्याला मान
पालखी रथाच्या पुढे असलेल्या चौघडा गाडी ओढण्यासाठी चिखली टाळगाव या ऐतिहासिक गावातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक बाळासाहेब सोपान मळेकर यांच्या नंद्या व संद्या बैलजोडीला मान देण्यात आला, अशी माहिती विशाल महाराज मोरे यांनी दिली.

दरम्यान देहू संस्थानच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी तयारी सुरू आहे. देहू नगरपरिषदेच्या वतीने विविध कामे सुरू आहेत. राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी नुकतीच देहू येथे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून तयारी सुरू आहे.

Web Title: These bullocks were selected from among 26 bullocks to pull Tukobaraya's palanquin chariot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.