Lokmat Agro >शेतशिवार > दिवसभर राब-राब राबायचे अन् रात्री शेतात पाणी देण्यासाठी जागायचे

दिवसभर राब-राब राबायचे अन् रात्री शेतात पाणी देण्यासाठी जागायचे

They used to work all day long and wake up at night to water the fields | दिवसभर राब-राब राबायचे अन् रात्री शेतात पाणी देण्यासाठी जागायचे

दिवसभर राब-राब राबायचे अन् रात्री शेतात पाणी देण्यासाठी जागायचे

भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर संकट..

भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर संकट..

शेअर :

Join us
Join usNext

साहेबराव हिवराळे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ग्रामीण भागात चार ते पाच तर शहरात किरकोळ कारणावरून तास-दोन तास नेहमीच अघोषित भारनियमन केले जाते. फ्यूज कॉल सेंटरला फोन केला की, 'लाइनमन बाहेर आहेत, आल्यावर सांगतो. आमची ड्युटी संपली' अशी उत्तरे मिळतात. शेतकऱ्यांची तर 'निसर्ग साथ देईना अन् महावितरण वीजपुरवठा सुरळीत ठेवेना' अशी दशा आहे. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जागरण करावे लागत आहे.

एकीकडे दिवाळी अंधारात साजरी होते की काय, अशी भीती शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत. दौलताबाद, माळीवाडा, पडेगाव यासह जवळच्या खेड्यांत अशी अवस्था आहे. फ्यूजची समस्या किंवा तारा तुटल्या असतील तर दुरुस्तीसाठी आठवडाभरदेखील वाट पाहावी लागते. बसविण्याच्या कामाला मंजुरी असतानाही ती अद्यापही न बसविल्याने त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे.

कोणत्या तालुक्यात किती भारनियमन ?

भारनियमन नाही असे अधिकृतपणे महावितरण सांगत असले तरी विजेच्या मागणीनुसार वीजपुरवठा नियोजन करण्यावर भर आहे. त्याचा फटक तालुकास्तरावर शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

सणासुदीत तरी.....

वीज गुल होण्याचा त्रास शहरात अनेक वसाहतीत वाढला आहे. सणासुदीत तरी असे होऊ नये. - मोहसीन अहमद, माजी नगरसेवक (शहर)

रात्री पाणी देण्यासाठी जागरण

बांधावर रात्र जागून काढावी लागते. वीजपुरवठा सुरळीत होत नाही. यासाठी शेतकन्यांना करावे. नेहमीच त्रास सहन करावा लागतो.- सांडू शेळके, शेतकरी

कधी दिवसा तर कधी रात्री वीज आली की, सारी कामे सोडून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी कुटुंबांना धावपळ करावी लागते.

कर्मचारी दक्ष

दिवाळीत परिसरात वीज सुरळीत ठेवण्यावर भर आहे, मोठा बिघाड असल्यास दुरुस्तीला वेळ लागतो, नागरिकांनी सहकार्य करावे.
-महावितरण अधिकारी

Web Title: They used to work all day long and wake up at night to water the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.