Lokmat Agro >शेतशिवार > पर्यावरणाचा समतोल अन् पैसे ही कमवून देईल हे कमी उत्पादन खर्चाचे पिक; वाचा सविस्तर

पर्यावरणाचा समतोल अन् पैसे ही कमवून देईल हे कमी उत्पादन खर्चाचे पिक; वाचा सविस्तर

This low-cost crop will balance the environment and earn money; Read in detail | पर्यावरणाचा समतोल अन् पैसे ही कमवून देईल हे कमी उत्पादन खर्चाचे पिक; वाचा सविस्तर

पर्यावरणाचा समतोल अन् पैसे ही कमवून देईल हे कमी उत्पादन खर्चाचे पिक; वाचा सविस्तर

Bamboo Sheti गोटखिंडी, (ता. वाळवा) येथील शेतकरी अरविंद पाटील यांनी ऊस शेती व इतर पिकांचा वाढता उत्पादन खर्च त्यातून मिळत असलेला दर याचा विचार करून दीर्घकालीन शाश्वत बांबू लागवड केली.

Bamboo Sheti गोटखिंडी, (ता. वाळवा) येथील शेतकरी अरविंद पाटील यांनी ऊस शेती व इतर पिकांचा वाढता उत्पादन खर्च त्यातून मिळत असलेला दर याचा विचार करून दीर्घकालीन शाश्वत बांबू लागवड केली.

शेअर :

Join us
Join usNext

प्रताप माने
गोटखिंडी : गोटखिंडी, (ता. वाळवा) येथील शेतकरी अरविंद पाटील यांनी ऊस शेती व इतर पिकांचा वाढता उत्पादन खर्च त्यातून मिळत असलेला दर याचा विचार करून दीर्घकालीन शाश्वत बांबू लागवड केली.

त्यांना बांबूतून दोन एकरात चार लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. अरविंद पाटील हे पर्यावरण समतोल ठेवण्यासाठी नेहमी विशेष उपक्रम राबवत असतात.

प्लास्टिक निर्मूलनसाठी गोटखिंडीत विशेष मोहीम राबवली होती. यातूनच प्रेरणा मिळत गेली. त्यांनी दोन एकरांवर अनुदानाची अपेक्षा न करता चार वर्षांपूर्वी बांबू लागवड केली.

१२x७ फूट अंतरावर २x२ चे खड्डे काढून त्यामध्ये पालापाचोळा व शेण खताने भरून ठेवले व जून जुलै महिन्यात बलको बांबू रोप लागण केली.

खतांच्या मात्रा व पाणी नियोजन केले. आंतरपीक म्हणून हरभरा, सोयाबीन व ऊसपीक घेतले. त्यातून त्यांना दीड लाखाचे उत्पन्न मिळाले.

बांबू पीक हे दीर्घकालीन शाश्वत पीक म्हणून चार वर्ष सांभाळ केला आहे. चार वर्षांनंतर त्यांची काढणी सुरू झाली असून यातून त्यांना चार लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे. बांबूपासून उपयोगी वस्तू तयार होऊ लागल्या आहेत.

वेलवर्गीय भाजीपाला, फळे, फुले पिकासाठी बांबू आवश्यक बाब बनली असल्याने मागणी वाढती आहे. - अरविंद पाटील, बांबू उत्पादक शेतकरी

अधिक वाचा: रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान अन् कसा मिळतो लाभ? वाचा सविस्तर

Web Title: This low-cost crop will balance the environment and earn money; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.