Lokmat Agro >शेतशिवार > बेदाणा प्रक्रियेमधील या आधुनिक तंत्रज्ञानाने होतेय वेळ, श्रम आणि खर्चात बचत

बेदाणा प्रक्रियेमधील या आधुनिक तंत्रज्ञानाने होतेय वेळ, श्रम आणि खर्चात बचत

This modern technology in grape raisins processing saves time, labor and cost | बेदाणा प्रक्रियेमधील या आधुनिक तंत्रज्ञानाने होतेय वेळ, श्रम आणि खर्चात बचत

बेदाणा प्रक्रियेमधील या आधुनिक तंत्रज्ञानाने होतेय वेळ, श्रम आणि खर्चात बचत

बेदाण्याची प्रतवारी ग्रीडिंग करण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचे नेटिंग मशीन उभा केलेले आहेत. बेदाण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. बेदाण्याची प्रतवारी, ग्रीडिंग करणे, स्वच्छता करणे सोपे झाले आहे.

बेदाण्याची प्रतवारी ग्रीडिंग करण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचे नेटिंग मशीन उभा केलेले आहेत. बेदाण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. बेदाण्याची प्रतवारी, ग्रीडिंग करणे, स्वच्छता करणे सोपे झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जत तालुक्यात बेदाण्याची प्रतवारी ग्रीडिंग करण्यासाठी इस्रायलच्या तंत्रज्ञानाचे नेटिंग मशीन उभा केलेले आहेत. बेदाण्यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. बेदाण्याची प्रतवारी, ग्रीडिंग करणे, स्वच्छता करणे सोपे झाले आहे. एक तासात लहान मशीन एक ते दीड टन व मोठी मशीन दोन ते अडीच टन बेदाणा प्रतवारी करून स्वच्छ करते.

मजुराद्वारे कामे करण्यासाठी चार दिवस लागायचे. ते केवळ दोन दिवसांत काम पूर्ण होऊ लागले आहे. वेळेची व श्रमाची बचत झाली आहे. कोरडे हवामान असल्याने सुटेखान, हिरवा, पिवळा असा दर्जेदार बेदाणा तयार होतो. प्रतवारीनुसार दर ठरतात. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

नेटिंग मशीनमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. सध्याच्या चायनीज् कंपनीच्या मशीनला दहा कॅमेरे आहेत. जुन्या मशीनमध्ये पाच कॅमेरे आहेत. बेदाणाची प्रतवारी करणे, स्वच्छ करणे नेटिंग करणे, पॅकिंग, वजन करणे ही किचकट वेळ खाऊ प्रक्रिया आहे.

यासाठी बेदाणा नेटिंग मशीन बसविलेले आहेत. मशीन चालविण्यासाठी बिहारी मजूर आहेत. उमदी, संख, सिद्धनाथ, दरीबडची, भिवर्गी, मुचंडी, कागनरी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी, बोर्गी करजगी, कोंतवबोबलाद, उटगी भागात बेदाणा नेटिंग मशीन आहेत.

शेडमध्ये टाकलेला बेदाणा झाडून नेटिंग मशीनवर जातो. बेदाणा स्वच्छ होतो. ग्रेडिंग केले जाते. हिरवा, पिवळा, डागी, काळा बेदाण्याची चांगली मध्यम कनिष्ठ प्रतवारी अचूक होते. बेदाण्याचे १५ किलोचे पॅकिंग केले जाते.

बेदाणा शेडवर यांत्रिकीकरणाने बेदाणा प्रतवारी ग्रीडिंग स्वच्छ होत असल्याने वेळेची बचत झाली आहे. तसेच चांगली प्रतवारी आणि स्वच्छता पॅकिंग होत आहे. भाव चांगला मिळतो असल्याने शेतकरी समाधानी आहेत. - कामाण्णा पाटील, बेदाणा उत्पादक, जालिहाळ खुर्द

यावर्षी इस्रायलच्या तंत्रज्ञानावर आधारीत नेटिंग मशीनचा चांगला उपयोग झाला आहे. बेदाणाची प्रतवारी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण होते. स्वच्छता, पॅकिंग ही सर्व कामे एकाचवेळी होत असल्याने शेतकऱ्यांची वेळ, श्रमाची बचत होते. - आनंदराव पाटील, नेटिंग मशीन चालक, दरीबडची

अधिक वाचा: धान्य स्वच्छ करण्याच्या या यंत्रामुळे महिलांना मिळतोय आराम

Web Title: This modern technology in grape raisins processing saves time, labor and cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.