Lokmat Agro >शेतशिवार > शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी राज्यात येतोय हा नवा प्रकल्प

शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी राज्यात येतोय हा नवा प्रकल्प

This new project is coming in the state to get the benefits of various schemes of the government to the farmers | शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी राज्यात येतोय हा नवा प्रकल्प

शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी राज्यात येतोय हा नवा प्रकल्प

केंद्राची Agri Stack ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

केंद्राची Agri Stack ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

शेअर :

Join us
Join usNext

केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत माहिती निर्मिती कक्ष, शेतकरी माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच आणि भूसंदर्भाकीत भूभाग असणारे गाव नकाशे माहिती संच महसूल विभाग तयार करेल. यासाठी माहिती वापर कक्षाची स्थापना कृषि विभाग करेल.

यासाठी सुकाणू समिती, अंमलबजावणी समिती, क्षेत्रिय स्तरावर विभागस्तरीय, जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठित करण्यात येतील. पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामात मिळून सुमारे ८१ कोटी ८३ लाख रुपये खर्च दरवर्षी येईल.

अधिक वाचा: शेतजमीन विक्रीतील फसवणूक टळणार राज्यात सुरु होतोय हा नवीन प्रकल्प

Web Title: This new project is coming in the state to get the benefits of various schemes of the government to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.