Lokmat Agro >शेतशिवार > हे मीठ आहे जगातील सर्वात महागड्या मीठांपैकी एक

हे मीठ आहे जगातील सर्वात महागड्या मीठांपैकी एक

This salt is one of the most expensive salts in the world | हे मीठ आहे जगातील सर्वात महागड्या मीठांपैकी एक

हे मीठ आहे जगातील सर्वात महागड्या मीठांपैकी एक

पोकळ बांबूपासून बनणारया या मिठाला जगभरातून मागणी...

पोकळ बांबूपासून बनणारया या मिठाला जगभरातून मागणी...

शेअर :

Join us
Join usNext

पाव किलो मिठासाठी तुम्ही ८ हजार रुपये खर्च करण्याची तुम्ही कल्पना कराल? आपल्यापैकी बहुतेकांना ही कल्पनाही हास्यास्पद वाटेल कदाचित. मात्र, जगातल्या महागड्या मिठापैकी एक असणाऱ्या २५० ग्रॅम मीठासाठी तब्बल १०० डॉलर म्हणजे रुपयांमध्ये ८३४० रुपये मोजावे लागतात. कोणतंय हे मीठ? इतकं महाग का विकलं जातं? चला जाणून घेऊया..

जगातल्या महागड्या मीठांपैकी असणाऱ्या या मीठाला 'पर्पल सॉल्ट' म्हणलं जातं. जगभरातल्या अनेक खाद्यपदार्थांसाठी या मीठाची मोठी मागणी आहे. कोरियन पाकसंस्कृतीचा भाग असणारं हे जांभळं मीठ त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. पण हे मीठ इतर मीठांपेक्षा वेगळं का आहे?

या मिठाला कोरियन बांबू सॉल्टही म्हटलं जातं.विशेष म्हणजे या देशातील लोक या जांभळ्या मीठाची शपथही घेतात. बांबूच्या पोकळ भागात समुद्री मीठ भरून खूप जास्त तापमानात हा बांबू भाजला जातो.बांबू भाजण्याच्या प्रक्रीयेमुळे या मीठातील खनिजांसह मीठ टणक होते. अनेक वेळा भाजल्यानंतर या मीठाचा रंग बदलतो आणि हे मीठ खडकाच्या आकारात म्हणजे घनरूपात येते. पुढे त्याला फोडून पावडरच्या स्वरूपात पॅक करून विकले जाते.

हे मीठ तयार करण्याची प्रक्रीया अत्यंत श्रमाची आणि किचकट समजली जाते. पोकळ बांबूमध्ये मीठ भरण्यापासून ते खडकासारखी घनता तयार झाल्यानंतर त्याला तोडण्यापासून विकण्यापर्यंतचे प्रत्येक काम बहूतांश हाताने होते. हे मीठ तयार करण्यास सुमारे ४० ते ४५ दिवस लागतात. बांबूच्या बॅरलमध्ये मीठ भरण्यापासून ते प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत त्याला ९ वेळा वितळवले जाते.

हे मीठ बांबूत भरल्यानंतर ८०० अंशांपेक्षा अधिक तापमानात  बांबूला भाजले जाते. या प्रक्रीयेत बाबू जळून जातो आणि आतल्या मीठाचा केवळ एक स्तंभ राहतो. जळलेला बांबू, मीठ हे सगळे एकत्र केले जाते. याची अंतिम प्रक्रीया सुमारे १००० अंश सेल्सियस तापमानात होते. हे मीठ मोठ्या घन खडकात बदलते. जे नंतर हाताने तोडतात आणि त्यानंतर ते खाण्यायोग्य किंवा वापरासाठी योग्य होते.

बांबू मीठ पचनासाठी चांगले समजले जाते. तसेच तोंडाच्या आरोग्यासह त्वचेची काळजी सुधारू शकते. त्यात कर्करोगामध्ये होणारा शरिराचा दाह कमी करू शकण्याची क्षमता आहे.

बांबूच्या मीठात सामान्य समुद्री मीठाच्या तुलनेत अधिक खनिजे आहेत. यात लोह, पोटॅशियम आणि कॅल्शियम अधिक असल्याने रोगप्रतिकारकशक्ती आणि चयापचय सुधारण्यासाठी या मीठाचा वापर करण्यात येतो. या मीठातून मिळणारे आरोग्य फायदे हे त्याच्या उच्च किमतीमागचे रहस्य आहे.

Web Title: This salt is one of the most expensive salts in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.