Join us

राज्यातील सर्वाधिक दर देणारा हा साखर कारखाना १५ लाख टन ऊस गाळप करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:57 AM

गळीत हंगाम हा १ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे सभासदांचे आडसाली उसास प्राधान्याने तोड देणार आहोत. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने त्याचाही फायदा ऊस उत्पादक सभासदांना होणार आहे.

बारामती : गळीत हंगाम हा १ नोव्हेंबर ऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यामुळे सभासदांचे आडसाली उसास प्राधान्याने तोड देणार आहोत. यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्याने त्याचाही फायदा ऊस उत्पादक सभासदांना होणार आहे.

माळेगाव कारखान्याचे १४ ते १५ लाख मे. टनाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती माळेगांव कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप यांनी दिली.

यावेळी सभासदांना उच्चांकी असा ३६३६.०० प्र. मे. टन असा उच्चांकी भाव तसेच कारखाना कर्मचारी यांना २५ टक्के बोनस दिल्याबद्दल बारामती तालुका साखर कामगार सभेच्या वतीने चेअरमन जगताप व मा. व्हाईस चेअरमन, संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, ज्येष्ठ संचालक बाळासोा पाटील तावरे, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, योगेश जगताप, सुरेश खलाटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते उपस्थित होते.

तसेच प्रताप आटोळे, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, पंकज भोसले, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, मंगेश जगताप, निशिकांत निकम, दत्तात्रय येळे, विलास कोकरे, कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.

यावेळी ज्ञानदेव बुरुंगले, संतोष जाधव, सुरेश देवकाते, अशोक तावरे, इंद्रसेन आटोळे, दशरथ राऊत, प्रकाश देवकाते, राजेंद्र तावरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

एफआरपीत वाढमाळेगाव सहकारी साखर कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन केशवराव जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी शांताबाई जगताप यांच्या हस्ते पार पडला. चेअरमन जगताप पुढे म्हणाले, केंद्र शासनाने यंदाच्या हंगामासाठी मूळ 'एफआरपी' जाहीर करताना रिकव्हरी बेस १०.२५ टक्के रुपये ३१५० वरून ३४०० 'एफआरपी'मध्ये वाढ केली आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीमालेगांवबारामती