Lokmat Agro >शेतशिवार > अंबरनाथमधील हे गाव होणार जांभळांचे गाव १० हेक्टरवर रोपांची लागवड

अंबरनाथमधील हे गाव होणार जांभळांचे गाव १० हेक्टरवर रोपांची लागवड

This village in Ambernath will be a village of Jambhal Plantation of seedling on 10 hectares | अंबरनाथमधील हे गाव होणार जांभळांचे गाव १० हेक्टरवर रोपांची लागवड

अंबरनाथमधील हे गाव होणार जांभळांचे गाव १० हेक्टरवर रोपांची लागवड

कल्याण तालुक्यातील अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले जांभूळ गाव लवकरच जांभळाचे गाव होणार आहे.

कल्याण तालुक्यातील अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले जांभूळ गाव लवकरच जांभळाचे गाव होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कल्याण तालुक्यातील अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले जांभूळ गाव लवकरच जांभळाचे गाव होणार आहे. गावाचे नाव जरी जांभूळ असले तरी येथील जांभळाची झाडे कमी झाली होती, त्यामुळे गावाची मूळ ओळख परत मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीने तयारी सुरू केली असून, कंपन्यांच्या सामाजिक दायीत्वातून १० हेक्टर जागेवर १० हजार जांभळांची झाडे लावली जाणार आहेत.

येत्या २ ऑगस्ट रोजी हे वृक्षारोपण पार पडेल, यासोबतच येथे तीन हेक्टरवर तीन हजार ३०० बांबूंची लागवडही केली जाणार आहे. अंबरनाथच्या चिखलौली भागातून या गावाकडे जाण्यासाठी रस्ता जाती. उल्हास नदीच्या पल्याड असलेले जांभूळ गाव विविध उपक्रमांमुळे कायमच चर्चेत राहिले आहे.

आपल्याला अंबरनाथ तालुक्यात समाविष्ट करून भौगोलिक त्रासातून सुटका करावी, अशी मागणी या गावच्या अनेक सरपंचांनी वेळोवेळी केली. मात्र, त्यात अद्यापही यश आलेले नाही. 

संस्थांचा शोध सुरू
गावाचे नाव जांभूळ असल्याने या गावात जाभळांची बाग किंवा मोठ्या संख्येने आहे आहेत का, असा प्रश्न कायमचं उपस्थित होतो. मात्र, गावाचे नाव जरी जांभूळ असले तरी गावात खूप अशी जांभळांची झाडे नाहीत. त्यामुळे गावाच्या राणात असलेले जांभूळ गावातही हवे या उद्देशाने स्थानिक ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी तयारी सुरु केली. त्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थांचा शोध सुरू केला. त्याचवेळी सरपंच परीक्षित पिसाळ यांना हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनी सामाजिक दातृत्वासाठी चांगल्या प्रकल्पाच्या शोधात असल्याची माहिती मिळाली.

खासगी कंपनीचे सहकार्य
या कंपनीच्या सामाजिक दातृत्व योजनेतून गावात जांभूळ झाडांची लागवड करण्याची मागणी केली. कंपनीनेही त्यासाठी तयारी दाखवली. त्यानुसार आता गावात असलेल्या गुरचरण अशा १० हेक्टर जागेवर जांभळांची लागवड केली जाणार आहे. येत्या २ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले आणार असल्याची माहिती पिसाळ यांनी दिली आहे.

Web Title: This village in Ambernath will be a village of Jambhal Plantation of seedling on 10 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.