बाजारपेठेत भाव पडले अन् हमीभावाने माल विक्री करायचा तर आता शेतकऱ्यांना अॅडव्हान्समध्ये ई समृद्धी अॅपवर आपल्या मालाची नोंदणी करून ठेवावी लागणार आहे. त्यानंतरच २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार माल घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४- २५ मध्येही राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेडमार्फत मका, तूर, चना, मूग, उडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे.
मात्र यासाठी नाफेडकडून शेतकऱ्यांसाठी e Samridhi पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. जर यावर नोंदणी केली नाही, तर शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी नंतर अडचणीचा सामना करावा लागू शकतो.
शेतीमालाचेबाजारपेठेत दर कोसळले की, निदान हमीभावाने तरी मालाची विक्री व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते; मात्र नोंदणी व इतर प्रक्रियांतून एकाचवेळी जाताना शेतकऱ्यांची मोठी अडचण होऊन बसते.
त्यामुळे नाफेडने आणलेल्या या नव्या उपक्रमाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. पीक पेरले की, नोंदणी केली म्हणजे हमीभाव मिळण्याची निश्चिंती राहणार आहे. तर बाजारपेठेत दर वधारले तर त्या दराने माल विकण्यासही काही अडचण राहणार नाही.
अडचण आल्यास संपर्क साधा
■ ई-समृद्धी पोर्टलवरील नोंदणीच्या माहितीसाठी अथवा त्यात काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी केले आहे.
संकेतस्थळ अथवा क्यूआर कोड वापरा
■ शेतकऱ्यांनी शेतीमालासाठी नोंदणी करण्यास आता केवळ आधार कार्ड लागणार आहे. सातबारा व इतर बाबींची गरज पडणार नाही. यासाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे.
■ तसेच https://esamrudhi.in/ #/login या संकेतस्थळाला भेट देऊन पूर्वनोंदणी करता येणार आहे.
हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी