Join us

यंदा ज्वारी, तांदुळावरच साजरी करावी लागणार दिवाळी; रेशन दुकानामधून गव्हाचे वाटप नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 4:39 PM

दिवाळी आली असतानाही परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, साखर व इतर जिनसांचे वाटप झाले नसल्याने गोरगरीब कुटुंबांना यंदाची दिवाळी या दुकानांमधून मिळालेल्या ज्वारी व तांदळावरच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

मुंडगाव : दिवाळी आली असतानाही परिसरातील स्वस्त धान्य दुकानांमधून गहू, साखर व इतर जिनसांचे वाटप झाले नसल्याने गोरगरीब कुटुंबांना यंदाची दिवाळी या दुकानांमधून मिळालेल्या ज्वारी व तांदळावरच साजरी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

शासनाच्या मोफत धान्य वाटप योजनेंतर्गत गरीब, अन्त्योदय, दारिद्र्य पात्र, रेषेखालील, अन्नपूर्णा योजनेंतर्गत या सर्वांना दिवाळीला मिळणारे गहू, साखर याचे अजूनपर्यंत वाटप झाले नसल्याचे बोलल्या जात आहे. महिन्याकाठी मिळणारे मानसी एक किलो ज्वारी व तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. परंतु दिवाळी आली असताना गहू व साखरेचे वाटप अजून करण्यात आले नसल्याचे समजते.

त्यामुळे गरिबांची दिवाळी ही ज्वारीच्या भाकरीवर साजरी होणार असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप लाभार्थीकडून होत आहे. किमान अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन लाभार्थीना धान्य वाटप करावे, अशी मागणी होत आहे.

ई-पॉस मशीनचा खोडा

● स्वस्त धान्य मालकांनी उचल केल्याचे समजते परंतु ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अडथळा येत असल्याने गहू, साखरेचे वाटप करण्यात आले नसल्याचे समजते.

● हा अडथळा दूर करून गोरगरीब कुटुंबांना दिवाळीच्या दिवसापर्यंत वाटप करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा : Farmer Success Story : मराठवाड्याच्या देवगाव येथील अनंतारावांची फुलशेतीतून आर्थिक प्रगती

टॅग्स :शेती क्षेत्रअकोलाविदर्भसरकारदिवाळी 2024