प्रतिकूल हवामान, कमी पाऊस, हवामानातील बदल यामुळे जत तालुक्यात कमी चिंचा लागल्या आहेत. चवीने आंबट असणारी चिंच शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत गोड धक्का देत होती. मात्र, यावर्षी चिंच उत्पादक शेतकऱ्यांना आंबटच राहणार आहे.
यावर्षी चिंचेला फुलोरा आला नाही. आलेला गळून गेला आहे. झाडावर थोड्या प्रमाणातच फुलोरा राहिला. सध्या झाडावर विरळ चिंचा आहेत. त्यामुळे यावर्षी चिंचेच्या उत्पादनात घट होणार आहे.
बहुगुणी चिंच चिंच चवीला आंबट असली तरी भारतीय खजूर' म्हणून तिला संबोधण्यात येते. चिंचेचा सार, कोळ, चटणी, अर्क, गर, पावडर, पन्हे, सरबत आयुर्वेदिक औषध त्याकरिता चिंचेचा उपयोग होतो. तसेच खळ, पावडर, बुक्का, कुंकूनिर्मितीत होते. बार्शी, सोलापूर येथे चिंचोक्यांपासून खतनिर्मिती करणारे कारखाने आहेत.
चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्वचिंचेच्या १०० ग्रॅम गरांमध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय ५.६ टक्के, 'क' जीवनसत्त्व ३ ग्रॅम इतके प्रमाण असते. विविध विकारांमध्ये चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे.
चिंच लागवड इतिहासम्हैसूर संस्थानात चिंच झाडाला प्राधान्य होते. अहल्यादेवी होळकर यांच्या संस्थानात ३०० वर्षापूर्वी ९०० ते १००० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा चिंचेचे झाडे लावली होती. त्याच्या उत्पादनाचा लिलाव पद्धतीने विक्री केल्याची नोंद आहे.
कापड उद्योगात उपयोगचिंचोक्याचा उपयोग खळ तयार करण्यासाठी होतो. चिंचोके खरेदी करून मुंबई, सोलापूर, इचलकरंजी, मालेगाव येथील गेल्यावर्षी २० ते २५ रुपये किलो विक्री झाली होती.
अधिक वाचा: रोजगार हमी योजनेतून या पिकाला मिळतंय हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान