Lokmat Agro >शेतशिवार > यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच

यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच

This year the sugarcane harvest will start soon the Diwali of the sugarcane workers is in sugarcane field this year | यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच

यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच

ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत.

ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत.

सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे. हा सण गरीब असो किंवा श्रीमंत सर्वजण आपापल्या पद्धतीने साजरा करतात.

घरात गोड फराळाचे पदार्थ, नवीन कपडे, फटाके वाजवणे, घराला सजवणे अशा पद्धतीने हा सण साजरा करतात.  परंतु ऊसतोड मजुरांची दिवाळी म्हणजे उसाच्या फडात साजरी होणार असल्याचे संकेत आहेत.

आम्ही चाळीसगाव येथून ऊसतोडीसाठी आलो आहे. आता बारामती भागात चाललो असून जवळपास सहा सात महिने याच परिसरात ऊसतोडणी चालू राहणार असून कोयत्याला दोन ते तीन लाख रुपये मिळतात.

यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यंदाची दिवाळी उसाच्या फडातच साजरी करणार असल्याचे ऊसतोड मजूर अनिल सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: This year the sugarcane harvest will start soon the Diwali of the sugarcane workers is in sugarcane field this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.