ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत.
सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे. हा सण गरीब असो किंवा श्रीमंत सर्वजण आपापल्या पद्धतीने साजरा करतात.
घरात गोड फराळाचे पदार्थ, नवीन कपडे, फटाके वाजवणे, घराला सजवणे अशा पद्धतीने हा सण साजरा करतात. परंतु ऊसतोड मजुरांची दिवाळी म्हणजे उसाच्या फडात साजरी होणार असल्याचे संकेत आहेत.
आम्ही चाळीसगाव येथून ऊसतोडीसाठी आलो आहे. आता बारामती भागात चाललो असून जवळपास सहा सात महिने याच परिसरात ऊसतोडणी चालू राहणार असून कोयत्याला दोन ते तीन लाख रुपये मिळतात.
यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. यंदाची दिवाळी उसाच्या फडातच साजरी करणार असल्याचे ऊसतोड मजूर अनिल सोनवणे यांनी सांगितले.