Lokmat Agro >शेतशिवार > सोयाबीन मूळकुज, खोडकूज रोगाचे वेळीच नियंत्रण

सोयाबीन मूळकुज, खोडकूज रोगाचे वेळीच नियंत्रण

Timely control of soybean collar root, charcoal rot | सोयाबीन मूळकुज, खोडकूज रोगाचे वेळीच नियंत्रण

सोयाबीन मूळकुज, खोडकूज रोगाचे वेळीच नियंत्रण

पीक जवळजवळ साधारणत: ५० ते ६० दिवसांपर्यंत आहे. या पीकवाढीच्या कालावधीत पिकाला सर्वांत जास्त अन्नपुरवठा आवश्यक आहे; परंतु ज्या भागामध्ये मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मूळकुज, खोडकुज, चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.

पीक जवळजवळ साधारणत: ५० ते ६० दिवसांपर्यंत आहे. या पीकवाढीच्या कालावधीत पिकाला सर्वांत जास्त अन्नपुरवठा आवश्यक आहे; परंतु ज्या भागामध्ये मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मूळकुज, खोडकुज, चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सद्य:स्थितीत सोयाबीन पीक काही ठिकाणी फुलोरा व फुलोरा संपून शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि पीक जवळजवळ साधारणत: ५० ते ६० दिवसांपर्यंत आहे. या पीकवाढीच्या कालावधीत पिकाला सर्वांत जास्त अन्नपुरवठा आवश्यक आहे; परंतु ज्या भागामध्ये मागील वर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मूळकुज, खोडकुज, चारकोल रॉट या रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता त्या भागामध्ये प्रामुख्याने चांदूरबाजार, अचलपूर त्याचप्रमाणे, मोर्शी या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झालेला होता.

यावर्षीसुद्धा काही भागांमधून सोयाबीन पॅचेसमध्ये वाढत असल्याच्या बातम्या प्राप्त होत आहेत त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या पावसाने उसंत दिलेली आहे दिवसाचे तापमान साधारण ३०-३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले आहे. त्यामुळे चारकोल रॉट म्हणजेच मूळकुज या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. काही विभागामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आलेला आहे.

काय आहेत लक्षणे?
सुरुवातीला शेताच्या काही भागांमध्ये जेथे शेताचा उतार असेल किंवा ज्या ठिकाणी पाणी साचत असेल अशा काही भागांत झाडाची पाने जमिनीकडे झुकू लागतात, मलूल होऊन पिवळी पडतात; परंतु झाडाची पाने गळून पडत नाहीत आणि पीक पॅचेसमध्ये वाळण्याची प्रक्रिया सुरु होते. जर झाड उपटून मुळे बघितली तर मुळाची साल अलगद निघून येते आणि मुळे पांढरी पडतात ही प्राथमिक अवस्था आहे; परंतु त्यानंतर पीक पूर्णपणे वाळून मुळावर करड्या भुरकट रंगाची बुरशी फळ दिसतात ही अवस्था म्हणजे झाड परत दुरुस्त होऊ शकत नाही.

शेतकऱ्यांनी काय करावे?
-
ज्यांच्याकडे ओलिताची सोय असेल तर एक संरक्षित ओलीत करणे जरुरी आहे, कारण सद्य:स्थिती पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे, जर जमीन कोरडी असेल ओलावा नसेल तर मुळे अन्नद्रव्य शोषू शकत नाही.
- ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची (५-१० ग्रॅम प्रतिलिटर) त्या पॅचेसमध्ये आळवणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा रोग शेतामध्ये वाढणार नाही आणि रोगाची तीव्रता कमी करता येईल. काही अंशी तीव्रता कमी करता येईल.
- संरक्षित ओलीत उपलब्ध नसल्यास पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याच्या दृष्टीने तसेच अन्नद्रव्य पुरवठ्याच्या दृष्टीने पोटॅशियम नायट्रेट १३.०.४५ या विद्राव्य खताची साधारणपणे १% १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी फवारणी उपयुक्त ठरते. पोटॅशियम नायट्रेटची फवारणी पिकांची संभाव्य ताणास प्रतिका क्षमता वाढविते आणि अजैविक घटक म्हणून पिकामध्ये रोगाच्या विरुद्ध प्रतिकारता वाढविते.

Web Title: Timely control of soybean collar root, charcoal rot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.