Join us

राज्यातील सात कृषी प्रशिक्षण संस्था स्वायत्त संस्था म्हणून घोषित

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 07, 2023 7:00 PM

शेतकऱ्यांना कृषिविषयक प्रशिक्षण देण्यासाठी कृषी प्रशिक्षण संस्थांना स्वायत्त संस्था म्हणून केले घोषित...

राज्यातील नागपूर, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, कोल्हापूर व खोपोली येथील सात कृषी प्रशिक्षण संस्थांना स्वायत्त संस्था म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक अद्ययावत  कृषी प्रशिक्षण देण्यासाठी हा निर्णय शासनाने जरी केला आहे.  

राज्यातील कृषी विकास घटकाचे महत्त्व लक्षात घेऊन कृषी आणि कृषीशी निगडित विषयांवर अद्ययावत प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षणार्थींसाठी असणाऱ्या वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी १३६४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यातील कृषी निगडित विषयांबाबत प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने नागपूर येथे वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था ही संस्था शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आली. 

रामेती, खोपोली येथे सध्या अस्तित्वात असलेली वसतिगृहाची इमारत 1974 मध्ये बांधण्यात आली असून त्यामध्ये केवळ 40 शेतकऱ्यांचे प्रशिक्षण होईल एवढेच व्यवस्था आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी ही व्यवस्था अपुरी असल्याने नवीन वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यामध्ये आवश्यक सोवी सोयीसुविधांनी युक्त असणारी निवास व्यवस्था, भोजन कक्ष, स्वयंपाक गृह, योगा व सांस्कृतिक हॉल इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रशेतकरीपीक