Join us

फवारणी करताना तंबाखू जीवघेणी ठरू शकते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2023 2:00 PM

अहमदनगर जिल्ह्यात काही भाग सोडला तर इतर ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. तरीही शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यात काही भाग सोडला तर इतर ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. तरीही शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. काही भागात त्यांची उगवणही चांगली झाली आहे. त्यामुळे शेतकयांची आता पिकांच्या खुरपणीची कामे सुरु आहेत. जोरदार पाऊस नसल्याने पिकांवर रोगराईही दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांनी अशी फवारणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तंबाखू खाऊन फवारणी केल्यास त्याचा धोका अधिक आहे.

फवारणी वाऱ्याच्या दिशेने करा

शेतकऱ्यांनी कशी फवारणी करावी याबाबत कृषी विभागाकडून वारंवार प्रबोधन करण्यात येते. तरीही याकडे दुर्लक्ष होते. यात वायाची दिशा ओळखूनच फवारणी करावी. ही काळजी घेतल्यास धोका टाळता येईल.

काय काळजी घ्याल?

तंबाखू खर्रा नकोच

तंबाखू अथवा मावा, गुटखा आदींचे सेवन करून फवारणी करू नये. असे केल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते.

धूम्रपान नको

फवारणीसाठी वापरण्यात येणारी कीटकनाशके मानवी शरीरास धोकादायक असतात. त्यामुळे धूम्रपान केल्यास त्यातून विषबाधा होण्याची शक्यता असते.

डोळे, तोंडाला हात लावू नये

फवारणी करताना कीटकनाशकाचे तुषार शरीरावर पडलेले असतात. त्यामुळे तेच हात डोळे अथवा तोंडाला लावू नयेत. त्यामुळे तेच हात डोळे अथवा तोंडाला लाऊ नयेत. 

... तर तातडीने डॉक्टरांना दाखवा'

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना शेतमजुरास अथवा शेतकऱ्यास अस्वस्थ वाटत असल्यास किंवा बेशुद्ध पडल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवावे.

"पिकांवर कीटकनाशक फवारणीवेळी काळजी न घेतल्याने विषबाधेचा धोका असतो. प्रसंगी जीवावरही बेतू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडून प्रबोधनही केले जाते." -सुधाकर बोराळे, अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर

टॅग्स :खतेशेतकरीतंबाखू बंदीडॉक्टरपीकपीक व्यवस्थापनअहमदनगरपाऊसमोसमी पाऊसशेती क्षेत्र