हिंगोली जिल्ह्यातील ग्राम कानडखेडा बु. परिसरात २७ नोव्हेंबरला अतिवृष्टीची नोंद झाली. तर २८ नोव्हेंबरलाही जोरदार अवकाळी पाऊस बरसला, चांगले उत्पादन यावे, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी तूर आणि कपाशीला वेळोवेळी पाणी दिले. त्यामुळे दोन्ही पिके बहारदार स्थितीत होते. अशातच दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने पाणी भरलेल्या तूर, कपाशीचे मोठे नुकसान झाले असून बोंड, शेंगा, फुलांचा पाचोळा झाल्याची स्थिती आहे. नुकसानीची स्थिती पाहता आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी,तहसीलदार यांच्याकडे ३० नोव्हेंबरला केली आहे.
तण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल! उभ्या पिकात सोडली जनावरे
निवेदनात म्हटले की, कानडखेडा बु, येथील शेतकऱ्यांची कानडखेडासह वांझोळा, वाढोणा शिवारात शेती आहे. २७ आणि २८ नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे कपाशी, तूर व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. कपाशी, तुरीचे पीक पूर्णतः आडवे झाल्याने शेतकऱ्यांची हाती काही लागणार नसल्याचे दिसते. गत काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसला आहे. शासनाने बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करुन विनाविलंब आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर प्रकाश भालेराव, विनोद पठाडे, दीपक डोळसकर, प्रकाश जोगदंड, गणेश ढोरे, भारत पठाडे, विजय पठाडे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ढगाळ वातावरणाचा कांदा, तूर आणि कपाशीवर होणारा परिणाम
खरिपातील तूर, कापूस या पिकांनादेखील या बदलत्या वातावरणाचा धोका निर्माण झाला आहे. फुलोऱ्यात असलेल्या तुरीला मारूका तर कापसाला बोंड अळीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन काढणीत असलेल्या या पिकांचा किडीपासून बचाव केला तरच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. ढगाळ वातावरण आणि हवेतील गारवा यामुळे धुई पडत आहे. तर कांद्याची वाढीवरही बदललेल्या वातावरणाचा परिणाम झाला आहे. तूरीवर मरुका अळी, कापसाला बोंडअळीचा तर कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही तीन्हीही पिके उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची आहेत.