Lokmat Agro >शेतशिवार > Toor Harvesting : एकरभर तुरीची हार्वेस्टरव्दारे अर्ध्या तासात सोंगणी वाचा सविस्तर

Toor Harvesting : एकरभर तुरीची हार्वेस्टरव्दारे अर्ध्या तासात सोंगणी वाचा सविस्तर

Toor Harvesting : Tur Harvester New Technology Useful For Farmer | Toor Harvesting : एकरभर तुरीची हार्वेस्टरव्दारे अर्ध्या तासात सोंगणी वाचा सविस्तर

Toor Harvesting : एकरभर तुरीची हार्वेस्टरव्दारे अर्ध्या तासात सोंगणी वाचा सविस्तर

Toor Harvesting : मजूर खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांची होतेय यंत्रामुळे पैश्यांची बचत वाचा सविस्तर

Toor Harvesting : मजूर खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांची होतेय यंत्रामुळे पैश्यांची बचत वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

मजुरांची टंचाई लक्षात घेऊन शहरासह तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या (Harvester) माध्यमातून तूरपिकाची सोंगणी (Harvesting) करण्यास सुरूवात केली आहे. एका एकरातील तूर पिकाची सोंगणी करण्यासाठी हार्वेस्टरला केवळ अर्धा तास लागत असून अडीच हजार रूपये खर्च येत आहे.

त्यामुळे तब्बल ७ हजार ५०० रूपये शेतकऱ्यांची बचत होत आहे. आता शेतकरी मजूर, मळणी यंत्राऐवजी हार्वेस्टरला पसंती देत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे.

शहरासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले आहे. पहिल्यापासून तालुक्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे तुरीचे पीक चांगले बहरले होते. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी आणि उडीद पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतले आहे.

सध्या तूरपीक काढणीला आले आहे. परंतु त्यासाठी मजूर मिळत नाही. मिळाले मजूर तर प्रतिदिवस ४०० ते ५०० रूपयांची मागणी केली जाते. ही मजुरी शेतकऱ्यांना परवडत नाही. एका एकरातील तूरपिकाची कापणी करण्यासाठी प्रति दिवस दहा मजूर लागतात. त्यामुळे त्यांचा खर्च साधारण ५ हजार रुपये होतो.

याशिवाय मळणीयंत्र, वाहतुकीसह इतर असा एकूण एक एकरासाठी दहा हजार रूपये खर्च येतो तर या उलट हार्वेस्टरने एका एकरातील तूर पिकाची सोंगणी केल्यास फक्त अडीच हजार रूपये खर्च येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैश्यांची बचत होताना दिसत आहे. त्यामुळे आता शेतकरी तुरीची सोंगणी हार्वेस्टर यंत्राव्दारे करण्यास पसंती देत आहेत.

पंजाबमधून हार्वेस्टरची मागणी

• केवळ अर्ध्या तासांत एका एकरातील तूर पिकाची सोंगणी हार्वेस्टरव्दारे केली जाते. यामुळे शेतकऱ्यांची तब्बल साडे सात हजार रूपयांची बचत होत असून वेळही वाचत आहे.

• यामुळे मजुराच्या तुलनेत हार्वेस्टर परवडत असल्याने शेतकरी त्याला पसंती देत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सध्या तालुक्यात पंजाबमधून हार्वेस्टर आणण्यात आले आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Tur Market : नवी तूर बाजारात येताच; तुरीच्या तोऱ्यात झाली घसरण

Web Title: Toor Harvesting : Tur Harvester New Technology Useful For Farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.