Lokmat Agro >शेतशिवार > Environment Friendly Healthy Research : पर्यावरणपुरक आणि आरोग्यवर्धक संशोधनाकडे वाटचाल

Environment Friendly Healthy Research : पर्यावरणपुरक आणि आरोग्यवर्धक संशोधनाकडे वाटचाल

Towards environmentally friendly and healthy research | Environment Friendly Healthy Research : पर्यावरणपुरक आणि आरोग्यवर्धक संशोधनाकडे वाटचाल

Environment Friendly Healthy Research : पर्यावरणपुरक आणि आरोग्यवर्धक संशोधनाकडे वाटचाल

Environment Friendly Healthy Research : बांबू, मिलेटमधील संशोधन सध्या सुरु असल्याने आगामी काळात मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे. 

Environment Friendly Healthy Research : बांबू, मिलेटमधील संशोधन सध्या सुरु असल्याने आगामी काळात मराठवाड्याला त्याचा फायदा होणार आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Environment Friendly Healthy Research : पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड आणि चांगल्या आरोग्यासाठी मिलेट अत्यंत आवश्यक आहे. बांबू व मिलेटमधील आंतरराष्ट्रीय संशोधनाचा मराठवाड्याला फायदा होईल, असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.  लातूर जिल्हयातील लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशनमध्ये आयोजित चर्चासत्रात त्यांनी सांगितले. 

यावेळी मनरेगाचे राज्याचे महासंचालक नंदकुमार, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले, माजी कुलगुरु प्रा.डॉ. संजय देशमुख, नवी दिल्लीतील डॉ. एम.जे. खान, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. मोहम्मद उस्मान, हैदराबाद येथील कोरडवाहू शेती अनुसंधान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. एस. ए. हुसेन, चेन्नईतील मूल्य साखळी तज्ज्ञ श्रेयसी अग्रवाल, एम. व्यंकटराव, जनशिक्षण संस्थेचे मोहन होडावडेकर, बांबू तज्ज्ञ संजीव कर्पे, पर्यावरण संशोधन अभ्यासक अलिशा चंद्रन, फिनिक्स फाउंडेशनचे परवेज पाशा पटेल  यांच्यासह निवडक प्र्गतिशील शेतकरी उपस्थित होते. 

या वेळी जगभरात व देशांतर्गत होत असलेल्या संशोधनाच उपयोग मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीत उपयुक्तरीत्या करता यावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावे, यासाठी संशोधनावर विचारमंथन यावेळी करण्यात आले. 

इलेक्ट्रिक चार्जिंगवरील मिनी ट्रॅक्टरचे लोकार्पण
यावेळी इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणाऱ्या मिनी ट्रॅक्टरचे प्रात्यक्षिक व लोकार्पण जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते झाले. सामान्य शेतकरी इंधनावरील खर्च कमी करुन आंतर मशागतीसाठी हे मिनी ट्रॅक्टर उपयुक्त ठरणार आहे.

इलेक्ट्रिक चार्जिंगवरील मिनी ट्रॅक्टर उपयोगी


टॅक्टरमध्ये विविध प्रकारच्या शेती उपयोगी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या लोकाभिमुख उपक्रमास राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. 
- वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हाधिकारी  

Web Title: Towards environmentally friendly and healthy research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.