Join us

सेंद्रिय कपाशी शेतकऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 1:31 PM

सेंद्रिय कपाशी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा एमआयटी कृषी अभियांत्रिकी विभाग व संजीवनी सक्षमीकरन व विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगरमध्ये ...

सेंद्रिय कपाशी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा एमआयटी कृषी अभियांत्रिकी विभाग व संजीवनी सक्षमीकरन व विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाली. यावेळी सेंद्रिय कपाशी लगवड, गरज व तंत्रज्ञान या विषयावर  शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करण्यात आले

यावेळी काही प्रगतीशील शेतकऱ्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रशांत नाईकवाडी, अध्यक्ष रोमिंफ इंडिया यांनी मार्गदर्शन केले.एमआयटी कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. दिपक बोरनारे यांनी सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन केले. संजीवनी सक्षमीकरन व विकास संस्थाचे प्रकल्प प्रमुख श्री अमोल राखून्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Todays Cotton Rates : आज कापूस दरात किती झाली सुधारणा?

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एमआयटीचे संचालक डॉ. निलेश पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. शिवकन्या ऐटवार यांनी केले.मेळावा यशाशिवेतेसाठी श्री. अमोल निकम, डॉ. स्वप्नील जैस्वाल, प्रा. प्राची बर्डे, प्रा. सुरेखा दाभाडे, प्रा.योगिता जाधव  व विभागातील विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :कापूसएमआयटी औरंगाबाद