Lokmat Agro >शेतशिवार > वाहतूकदारांच्या आंदोलनाचा शेतमालाला फटका; आवक घटली

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा शेतमालाला फटका; आवक घटली

Transporters' strike hits agriculture; agri produce incoming decreased in apmc | वाहतूकदारांच्या आंदोलनाचा शेतमालाला फटका; आवक घटली

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा शेतमालाला फटका; आवक घटली

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती. परंतु, कांदा मार्केटमध्ये २५ टक्के आवक कमी झाली.

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती. परंतु, कांदा मार्केटमध्ये २५ टक्के आवक कमी झाली.

शेअर :

Join us
Join usNext

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका शेतमालाला बसला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला व मसाला मार्केटमध्ये आवक सुरळीत होती. परंतु, कांदा मार्केटमध्ये २५ टक्के आवक कमी झाली. धान्य वाहतुकीलाही फटका बसला. कांद्याचे २१ ट्रक व ५१ टेम्पो, बटाट्याचे ३४ ट्रक व १२ टेम्पो, लसणाचे ८ ट्रक व २ टेम्पोची आवक झाली. धान्य मार्केटमध्येही २५६ ट्रक, टेम्पोची आवक झाली.

विरोध नेमका कशामुळे?

जुना कायदा काय म्हणतो?नवीन कायद्यात काय तरतूद?
हिट अँड रन घटनांशी संबंधित विद्यमान कायद्याचा भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०४ अ अंतर्गत जो कोणी अविचारी किंवा निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल त्याला दोन वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्या जातील.१०४ (१) : निष्काळजी कृत्याद्वारे एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे सदोष मनुष्यवध नाही. दोषीला ५ वर्षापर्यतचा कारावास आणि दंड.
१०४ (२) : घटनास्थळावरून पळून गेला किंवा घटनेनंतर लगेच पोलिस अधिकारी किवा दंडाधिकारी यांना घटनेची माहिती दिली नसेल तर १० वर्षापर्यंतचा कारावास आणि दंड.

मालवाहतूक ठप्प
वाहनचालकांनी जेएनपीए परिसरातील कंटेनर वाहतूक रोखली. नंतर वाहने रस्त्याच्या कडेला लावून रस्ता खुला केल्याची माहिती न्हावा - शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांना दिली. पण, चालकांनीच वाहने चालविण्यास नकार दिला. यामुळे पाचही बंदरातील कंटेनरची वाहतूक ठप्प झाली. आठ हजार कंटेनर ट्रेलर्सवर चालक नसल्याने वाहने उभी करून ठेवल्याची माहिती न्हावाशेवा कंटेनर ओनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोतदार यांनी दिली. बंदरातून दररोज सुमारे २५ हजार कंटेनरची वाहतूक होते. बंदमुळे त्यांची चाके थांबल्याची माहिती महाराष्ट्र हेवी व्हेइकल अॅण्ड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी दिली.

Web Title: Transporters' strike hits agriculture; agri produce incoming decreased in apmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.