Lokmat Agro >शेतशिवार > आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण मिळणार, वाचा सविस्तर 

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण मिळणार, वाचा सविस्तर 

Tribal farmers will get beekeeping training, read details | आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण मिळणार, वाचा सविस्तर 

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन प्रशिक्षण मिळणार, वाचा सविस्तर 

मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : आदिवासी भागातील शेतकरी, युवक आणि महिला रोजगार व स्वंयरोजगारास चालना देण्यासाठी आदिवासी विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषि विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी दिले.

आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आदिवासी समुहांसाठी मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रशिक्षणाबाबत बैठक संपन्न झाली. याप्रसंगी डॉ. गावीत यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले कि, मधुमक्षिका पालन व्यवसायाचे प्रशिक्षण आदिवासी क्षेत्रातील शेतकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने देण्यात येईल. प्रत्येक गावातून या प्रशिक्षणासाठी  10 लाभार्थींची निवड करण्यात येईल. मुक्त विद्यापीठामार्फत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे उद्योजकता आधारीत कौशल्य  विकास निवासी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच प्रत्येक लाभार्थींना मधुमक्षिका पेट्यांचे वाटप करण्यात येईल. 

मध आणि त्याच्या उप उत्पादनांची बाजारपेठेत प्रचंड मागणी वाढत आहे. मध, प्रोटीनयुक्त पॉलीन्स आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी दोन आर्थिकदृष्ट्या महत्वाची उत्पादने आहेत. मध आणि त्याच्या उत्पादनांची मागणी यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळेल आणि त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यास नक्कीच मदत होईल. तसेच पुढे परागीभवनाच्या माध्यमातुन कृषी उत्पादनात नैसर्गिकरित्या भरपूर वाढ होणार आहे असे त्यांनी सांगितले.  

यावेळी मुक्त विद्यापीठाचे डॉ. तुकाराम निकम यांच्या इस्त्रायलची सदाहरीत मधुक्रांती  या पुस्तकाचे विमोचन मा. मंत्री. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी शासनाने मुक्त विद्यापीठास ही संधी दिली, त्याबद्दल मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावीत तसेच आदिवासी विकास विभागाचे आभार मानले. या बैठकीस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, उपसचिव मच्छिंद्र शेळके, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम निकम, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे उपस्थित होते.

  पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

 

Web Title: Tribal farmers will get beekeeping training, read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.