Lokmat Agro >शेतशिवार > Tur Variety महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाण परभणी कृषी विद्यापीठाकडून विकसित

Tur Variety महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाण परभणी कृषी विद्यापीठाकडून विकसित

Tur Variety; The first hybrid variety of pigeon pea in Maharashtra developed by Parbhani Agricultural University | Tur Variety महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाण परभणी कृषी विद्यापीठाकडून विकसित

Tur Variety महाराष्ट्रातील तुरीचा पहिला संकरित वाण परभणी कृषी विद्यापीठाकडून विकसित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित करण्यात आलेला तुरीचा बिडिएनपीएच १८-५ या संकरित वाणास अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प खरीप कडधान्य, कानपूरद्वारा इक्रीसॅट, हैद्राबाद येथे घेण्यात आलेल्या वार्षिक समूह बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

या वाणाची शिफारस महाराष्ट्रासह भारताच्या मध्य विभागासाठी करण्यात आलेली आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील कृषि विद्यापिठाद्वारे शिफारस करण्यात आलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणाच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम केलेले आहेत आणि बिडिएनपीएच १८-५ या संकरित वाणामुळे शेतकऱ्यांची भरीव आर्थिक उन्नती साधता येईल.

शेतकऱ्यांसाठी हा संकरित वाण लवकरच उपलब्ध करण्यात येईल असे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी नमूद केले.

बिडिएनपीएच १८-५ वाणाची वैशिष्ट्ये
- या वाणाची उत्पादकता १७५९ ते २१५९ किलोग्रॅम प्रति हेक्टरी
- हा वाण १५५ ते १७० दिवसात तयार होतो.
- दाण्याचा रंग पांढरा
- मर आणि वांझ या तुरीच्या प्रमुख रोगांकरिता हा वाण मध्यम प्रतिकारक आहे.
- किडींना कमी बळी पडतो.

सदर वाण विकसित करण्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. के. पाटील, डॉ. व्ही. के. गीते या शास्त्रज्ञांनी डॉ. के. टी. जाधव, प्रशांत सोनटक्के, डॉ. पी. ए. पगार आणि डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे यांच्या सहकार्याने हा वाण प्रसारित केला.

या वाण प्रसारामुळे विद्यापीठामध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी कृषि संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले.

अधिक वाचा: Soybean Sowing शेतकऱ्यांनो सोयबीन पेरताय हे करा नाहीतर होऊ शकते नुकसान

Web Title: Tur Variety; The first hybrid variety of pigeon pea in Maharashtra developed by Parbhani Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.