पारंपारिक बाजरी सारखेचे व्यवस्थापन करत मात्र फक्त वेगळ्या वाणांची लागवड केल्याने आज गौरव यांना 'तुर्की' या बाजरी पासून तीन पट अधिक उत्पादनाची आशा निर्माण झाली आहे. तेरा ते पंधरा फुट उंच वाढलेल्या तसेच तीन ते चार फुट लांबीच्या कणसांमुळे ही बाजरी सध्या परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
शिर्डी विमानतळ ते शिर्डी रस्तावरील कोऱ्हाळे (ता. राहता) येथील गौरव रविंद्र कोऱ्हाळकर यांना वडीलोपार्जित ५ एकर कोरडवाहू शेती आहे. ज्या पैकी ३ एकर क्षेत्रात सोशल मिडियावरून माहिती मिळालेल्या 'तुर्की' या वाणांच्या बाजरीची जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागवड केली आहे. राजस्थान येथून मागवलेल्या या बाजरीचे पारंपारिक बाजरी सारखेच व्यवस्थापन केले गेले आहे.
पंधरा फुट उंचीसह तीन ते चार फुट कणीस
आज रोजी अडीच महिन्यात या बाजरीने तेरा ते पंधरा फुट ऊंची गाठलेली आहे. सोबतच तीन ते चार फुट लांबीचे दमदार कणीस काढले आहे. अधिक उंचीच्या वाढीमुळे अधिक चारा उत्पादन तर कणीसांच्या जास्त लांबीमुळे तीन पट अधिक बाजरीचे उत्पादन होणार असल्याचे गौरव कोऱ्हाळकर सांगतात.
वातावरण अनुकूल बाजरी
खरीप, लेट खरीप व रब्बी अशा तीनही वातावरणात 'तुर्की' बाजरी अनुकूल आहे. तसेच कमी पाणी व कमी वेळेत येणारे हे वाण असल्याचे देखील गौरव सांगतात.
उत्पादनात वाढविणारी तुर्की बाजरी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान
पारंपारिक बाजरीतून उत्पादन कमी असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना 'तुर्की' बाजरी वरदान ठरू शकेल. सोबतच अधिक चारा उत्पादन होत असल्याने दुष्काळात देखील 'तुर्की' बाजरी फायद्याची ठरू शकते त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी पारंपारिक बाजरीला फाटा देत आता या आधुनिक 'तुर्की' वाणाच्या बाजरीची लागवड करणे गरजेचे असल्याचे गौरव सांगतात.
हेही वाचा - Sericulture Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत महेशने शोधली रेशीम शेतीतून नोकरी