Join us

Turmeric Crop : शेतकऱ्यांचा हळद पिकाकडे कल वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 11:44 AM

Turmeric Crop : हळद पिकाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आता हळद पिकाकडे वळतांना दिसत आहेत.

Turmeric Crop : 

मागील काही वर्षांपासून हळदीला मिळत असलेल्या उच्चांकी दरामुळे जिल्ह्यात हळदीचा पेरा वाढला आहे. यावर्षी जिल्ह्यात ८ हजार १७६ हेक्टरवर हळदीची पेरणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार ९५० हेक्टरने वाढ झाली आहे.जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. त्यापाठोपाठ तूर, मूग, उडीद, कापूस आदी पिकांची पेरणी प्रामुख्याने खरीप हंगामात होते. परंतु मागील काही वर्षांत सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. जिल्ह्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे शेतकरी हळदीच्या पिकांना प्राधान्य देत आहेत.इतर तालुक्याच्या तुलनेत वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यात हळदीची सर्वाधिक पेरणी होते. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा बाजारात प्रतिक्विंटल चांगला भाव मिळाला आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली असून यामुळे अनेकांना जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्येही हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे मागील काही वर्षांपासून पिकाकडे कल वाढत चालला आहे. यामुळे पुढील काळात देखील जिल्ह्यात हळदीचा पेरा वाढणार असल्याचे चित्र दिसते. 

हळदीला उच्चांकी दरवाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद कांडीला यंदा सर्वाधिक २० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर इतर बाजार समित्यांमध्येही हळदीला चांगले दर मिळाले होते. यामुळे अनेक शेतकरी हळद उत्पादनाकडे वळताना दिसत आहेत.

 हळद लागवड क्षेत्र वाढले

मागील काही दिवसांपासुन हळद पीकाला चांगले दर मिळत आहेत. पाण्याची देखील सहज उपलब्धता होत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी हळद पीकांची लागवड करु लागले आहेत. त्यामुळे लागवड क्षेत्र वाढले आहे.- मोतीराम राऊत, शेतकरी

जिल्ह्यातील हळद क्षेत्राचा पेरा  

वाशिम            २५१२ हेक्टररिसोड             ३०१४ हेक्टरमालेगाव           २२६० हेक्टरमंगरुळपीर       २७० हेक्टरकारंजा              ६० हेक्टरमानोरा               ६० हेक्टर 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेती