Lokmat Agro >शेतशिवार > हळद निर्यातीला मिळणार चालना

हळद निर्यातीला मिळणार चालना

Turmeric exports will get a boost | हळद निर्यातीला मिळणार चालना

हळद निर्यातीला मिळणार चालना

हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापनेसाठी शंभर कोटींचा निधी प्राप्त

हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापनेसाठी शंभर कोटींचा निधी प्राप्त

शेअर :

Join us
Join usNext

हळद  पिकाच्या निर्यातवाढीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, हळदीवर नवीन संशोधन व्हावे याकरिता राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली होती. त्यानुसार केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून नुकतीच राष्ट्रीय हळद बोर्ड स्थापनेची घोषणा केल्याची माहिती खा. हेमंत पाटील यांनी दिली.

वसमत येथे बाळासाहेब हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापनेसाठी शंभर कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने हळद पिकाच्या निर्यातीला चालना मिळणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन बाजारपेठ विकसित करणे, संशोधन विकासाला चालना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी हळद बोर्डाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी खा. पाटील यांनी केली होती. त्यानुसार बोर्ड स्थापनेची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

राष्ट्रीय हळद मंडळाचे काम केंद्र सरकारने नियुक्त केलेले अध्यक्ष पाहणार असून, आयुष मंत्रालय, केंद्र सरकारचा औषध निर्माण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील सदस्य, तसेच तीन राज्यांतील राज्य सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी, संशोधनात सहभागी असलेल्या राष्ट्रीय / राज्यस्तरीय निवडक संस्था, हळद उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार यांचे प्रतिनिधी आणि वाणिज्य विभागाद्वारे नियुक्त केलेले सचिव यांचा समावेश या हळद मंडळात राहणार असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

  • हळद लागवड उत्पादनात महाराष्ट्र, तेलंगणा राज्यानंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २०१९-२० मध्ये देशात २.१८ लक्ष हळदीचे क्षेत्र होते. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात ०.५५ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली होती. २०२१-२२ मध्ये राज्यात हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र सुमारे ८४ हजार ०६६ हेक्टर होते.
     
  • त्यापैकी एकट्या हिंगोली जिल्ह्यात ४९ हजार ७६४ हे. क्षेत्रावर हळद होती. त्याखालोखाल नांदेड १३ हजार १३१ हेक्टर, वाशिम ४ हजार १४९, यवतमाळ ३ हजार ७३६, परभणी ३ हजार १५१, सातारा १ हजार ७८८ बुलढाणा १ हजार ७६३, जालना १ हजार ७७, जळगाव ९८४, चंद्रपूर ७८७, सांगली ७७४, गोंदिया ३८२, भंडारा ३७५ आणि नागपूर ३५१ हेक्टर असा जिल्हावार लागवडीचा क्रम लागतो.
     
  • आजवर हळदीसाठी प्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा हळदीच्या लागवड क्षेत्राचा विचार करता अकराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

Web Title: Turmeric exports will get a boost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.