Lokmat Agro >शेतशिवार > महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ यांचा दिल्लीमध्ये गाजावाजा

महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ यांचा दिल्लीमध्ये गाजावाजा

Turmeric, Pomegranate, Banana, Jaggery of Maharashtra's Geographical Indications are being popular in Delhi | महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ यांचा दिल्लीमध्ये गाजावाजा

महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ यांचा दिल्लीमध्ये गाजावाजा

भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती.

भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती.

शेअर :

Join us
Join usNext

भारत भौगोलिक मानांकन उत्पाद मेळाव्यात महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकने प्राप्त हळद, डाळिंब, केळी, गुळ, हस्तशिल्प तसेच हातमाग आदी उत्पानांची दालने उभारण्यात आली होती. या दालनांना चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची भावना सहभागी संस्थांनी व्यक्त केली.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयांच्या अधिनस्त निर्यात प्रमोशन कौन्सिल फॉर हॅन्डीक्राफ्ट्स (EPCH) द्वारे इंडिया एक्स्पो सेंटर आणि नॉलेज पार्क, ग्रेटर नोएडा येथे हस्तकलेसाठी निर्यात प्रोत्साहन परिषद GI (भौगोलिक मानांकन) फेअर इंडिया २०२३ चे आयोजन २० ते  २४ जुलै २०२३ या दरम्यान करण्यात आले होते. या मेळ्याव्यात ४६० पेक्षा जास्त भौगोलिक मानांकन उत्पादनांचे दालन उभारण्यात आले होते.

इंडिया एक्स्पो सेंटर आणि मार्ट, ग्रेटर नोएडा येथे या मेळ्याचे उद्घाटन २० जुलै रोजी केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांच्या हस्ते झाले. यावेळी निर्यात प्रमोशन कौन्सिल फॉर हॅन्डीक्राफ्ट्स चे अध्यक्ष दिलीप बैद उपस्थित होते.

भौगोलिक मानांकन (GI) म्हणजे काय ?

भौगोलिक चिन्ह हे विशिष्ट उत्पादनांना दिलेले नाव किंवा चिन्ह आहे. ज्या उत्पादनांची पौष्टिकता व वैज्ञानिक महत्त्वानुसार, विशिष्ट भौगोलिक स्थानाशी संबंधित आहे किंवा राष्ट्रीय स्तरावर ओळखले जात असलेल्या उत्पादनांना भौगोलिक संकेत देण्यात येते. या उत्पादनाशी समाजाची बौद्धिक संपदा जोडलेली असते.

या मेळाव्यात, महाराष्ट्राच्या वतीने येथे भौगोलिक मानांकने मिळालेल्या उत्पादनाची दालने उभारण्यात आली होती. यामध्ये ७ हस्तशिल्पांची, २१ शेतमालाशी निगडित उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
 

Web Title: Turmeric, Pomegranate, Banana, Jaggery of Maharashtra's Geographical Indications are being popular in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.