Join us

शेतकऱ्यांकडून स्वखर्चातून दोन कि.मी. रस्त्याची दुरुस्ती

By बिभिषण बागल | Published: August 01, 2023 9:24 AM

अनेक वेळा शासन दरबारी येथील शेतकऱ्यांनी निवेदने दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींसह सर्व स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले गेले होते. परंतु सुस्तावलेल्या प्रशासनामुळे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबितच होता.

पाळे खुर्द शिवारातील शेतकऱ्यांनी आपला प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच कंबर कसली आणि लोकवर्गणीतून पैसा उभा करत चक्क दोन किलोमीटर रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे ग्रामस्थामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. येथील अष्टभुजा देवी मंदिर ते लिफ्टन शिवार अशा रस्ता दुरुस्तीची मागणी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित होती. अनेक वेळा शासन दरबारी येथील शेतकऱ्यांनी निवेदने दिली. स्थानिक लोकप्रतिनिधींसह सर्व स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले गेले होते. परंतु सुस्तावलेल्या प्रशासनामुळे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न प्रलंबितच होता.

अखेर पाळे खुर्द शिवारातील शेतकऱ्यांनी आपला प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच कंबर कसली आणि लोकवर्गणीतून पैसा उभा करत चक्क दोन किलोमीटर रस्त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले. कळवण तहसीलदार यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीबाबत परवानगी घेत यथाशक्ती होईल अशा पद्धतीने ५० हून अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येत साहेबराव पाटील, एकनाथ पाटील, विलास पाटील, गुलाब पाटील, दादभाऊ पाटील, केदा पाटील, सुनील पाटील, महेश पाटील, सुभाष पाटील, सचिन पाटील, अभिमान निकम, दीपक पाटील, रोशन देवरे, शिवाजी नारायण यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डिझेलसाठी पैशांची मदत केली तर कोणी आपले ट्रॅक्टर मुरूम माती वाहण्यासाठी देऊन सढळ हाताने मदत केली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना मणक्याचे आजार, पावसाळ्यात छोटे-मोठे अपघात अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. तसेच शेतमाल नेण्यासाठी देखील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती.

एकीचे बळयेथील शेतकऱ्यांनी एकत्र येत आपली समस्या आपणच सोडवायला हवी या विचारातून श्रमदान व पदरमोड करायचा निर्णय घेत रस्ता दुरुस्तीचा चंग बांधला. प्रशासनाची परवानगी तपाळे खुर्दच्या शेतकयांनी एकाच दिवसात २ किलोमीटरचा रस्ता दुरुस्त करून एक नवा आदर्श कळवण तालुक्यात निर्माण केला आहे. पाळे खुर्द येथील शेतकऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :शेतकरीशेतीपीकसरकार