छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दुष्काळामुळे यंदा दोन महिने आधीच शेत रिकामे झाल्याने खरीप हंगामासाठी शेती नांगरणी करण्यात येत आहे. मात्र, यंदा मशागतीचा खर्च देखील वाढल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत असून आधीच दुष्काळ त्यात दर वाढीने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे.
यंदा दुष्काळ असल्याने रब्बीसह उन्हाळी पिके पाण्याअभावी शेतकऱ्यांना घेता आली नाही. त्यामुळे यंदा लवकरच दोन महिने आधीच शेतकऱ्यांनी शेत नांगरणी सुरु केली आहे. लवकर नांगरणी केल्याने दोन महिने जमीन चांगली तापून खरिपाच्या पिकांना फायदा होणार आहे. मागील वर्षी नांगरणी प्रती एकर बाराशे रुपये दराने होत होती मात्र यंदा चौदाशे ते सोळाशे रुपये प्रति एकर ट्रॅक्टर दराने होत आहे.
मागील वर्षी पाऊस कमी पडला व रब्बीत शेतीला विहिरीत पाणी नसल्याने जमीन कडक झालेली आहे. त्यामुळे नांगरणी करण्यासाठी वेळ व डिझेलचा खर्च वाढल्यामुळे नांगरणीचा दर दोनशे रुपयांनी वाढवला असल्याचे ट्रॅक्टर मालक संजय भालेराव यांनी सांगितले.
शेतकर्यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा
हे वर्ष नव्हते सुगीचे..
सुरुवातीपासूनच यंदा खरीप सह रब्बी व उन्हाळी हंगाम असे कोणतेच पीक हाती न आल्याने हे वर्ष नव्हते सुखाचे, हे वर्ष नव्हते सुगीचे अस म्हणण्याची वेळी शेतकर्यांवर आली आहे.